क्रिकेटर रविंद्र जडेजाने पंतप्रधान मोदींची घेतली भेट

टीम इंजियाचा स्टार खेळाडू रविंद्र जडेजा आणि त्याची पत्नी रिवाबाने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. या भेटीचे फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदींने आपल्या ट्विटरवरून हे फोटो शेअर केले आहे.

ravindra jadeja
पंतप्रधान मोंदींची भेटीदरम्यान खेळाडू रविंद्र जडेजा आणि त्याची पत्नी रिवाबा

टीम इंजियाचा स्टार खेळाडू रविंद्र जडेजा हा आपल्या खेळासाठी मैदानावर चर्चेत असतो. रविंद्र जडेजाने आपल्या पत्नी रिवाबासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीचा फोटो खूद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटरवरून शेअर केला आहे. ऑस्टेलिया विरूद्ध टी-२० सीरीजमध्ये टीम इंडियामध्ये निवड न झाल्यानंतर आता रविंद्र जाडेजा रनजी ट्रॉफी आणि आपल्या कुटुंबीयांसह वेळ घालवत आहे. मंगळावारी त्याने आपल्या पत्नीसह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. मोदींनी या भेटीचा फोटो ट्विटवरून शेअर करत सांगितले की,’प्रसिद्ध क्रिकेटर रविंद्र जडेजा आणि त्याची पत्नी यांना भेटून आनंद झाला.’

पंतप्रधानांना भेटणे अभिनमानाची गोष्ट

देशाच्या पंतप्रधानांनी कामातून वेळ काढून भेट दिल्यामुळे जडेजाने त्यांचे आभार मानले आहे. जडेजानेही आपल्या अधिकृत अकाऊंडवरून भेटी दरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. देशाच्या पंतप्रधानाला भेटणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे त्याने लिहिले आहे. पंतप्रधान यांचे व्यक्तिमत्व प्रभावी असल्याचे त्याने सांगितले. या फोटोमध्ये जडेजा आपल्या पत्नीसोबत पंतप्रधांनाना पुष्पगुच्छ देतांना दिसून येतो.

रीवाबा जडेजाची अध्यक्ष म्हणून नेमणूक

काही दिवसांपूर्वी रविंद्र जडेजाची पत्नी रीवाबा जडेजाला गुजरात येथील राजपूत करणी सेनेने महिला गटाच्या अध्यक्ष म्हणून नेमले होते. सध्या रीवाबा महिला गटाचे अध्यक्षा म्हणून कार्यरत आहे. या मुलाखातीत कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली यावर अद्याप कोणीही वक्तव्य केलेले नाही.