घरराजकारणगुजरात निवडणूकभाजपच्या पोस्टरवर रवींद्र जडेजाचा भारतीय संघाच्या जर्सीतील फोटो; चाहते नाराज, म्हणाले...

भाजपच्या पोस्टरवर रवींद्र जडेजाचा भारतीय संघाच्या जर्सीतील फोटो; चाहते नाराज, म्हणाले…

Subscribe

भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा आपल्या खेळीच्या जोरावर नेहमीच क्रिकेटप्रेमींच्या चर्चेत असतो. भारतीय संघासाठी जडेजाचे आतापर्यंतचे योगदान मोलाचे ठरलं आहे. मात्र, सध्या हाच जडेजा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा आपल्या खेळीच्या जोरावर नेहमीच क्रिकेटप्रेमींच्या चर्चेत असतो. भारतीय संघासाठी जडेजाचे आतापर्यंतचे योगदान मोलाचे ठरलं आहे. मात्र, सध्या हाच जडेजा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. कारण भाजपाच्या पोस्टरवर रवींद्र जडेजाचा फोटो लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे जडेजाचा हा फोटो भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीतला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, चाहत्यांना जडेजाला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. (ravindra jadeja trolled for using team india jersey in gujarat assembly election poster social media reaction)

पुढील महिन्यात गुजरात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजाला भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत रिवाबा ही जामनगर उत्तर मतदारसंघातून भाजपची उमेदवार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जडेजाची पत्नी रिवाबासाठी रोड शो करत आहे. मात्र, रोड शोच्या पोस्टरवर वापरण्यात आलेल्या फोटोत जडेजा भारतीय संघाच्या जर्सीत आहे. यावरून जडेजा सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला आहे.

- Advertisement -

जडेजाची पत्नी रिवाबाने स्वत: ट्विटरवर जडेजाचा टीम इंडियाच्या जर्सीतील फोटो शेअर केला होता. हा फोटो रवींद्र जडेजानेदेखील रिट्विट केला. यानंतर जडेजा ट्रोल झाला. आता विरोधी पक्षांनीही जडेजावर निशाणा साधला आहे. सोशल मीडिया यूजर्सने हे पोस्टर शेअर करत जडेजाला टार्गेट केले आहे.

सुंदरम दीक्षित नावाच्या एका युजरने रवींद्र जडेजाला संघातून काढून टाकण्याची मागणी केली आहे. तसेच, दीपांशू नावाच्या एका युजरने लिहिले आहे की, “राजकीय प्रचारात भारतीय क्रिकेट संघाची जर्सी वापरणे योग्य आहे का? यासोबतच त्याने बीसीसीआयलाही टॅग केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सेल्फी घेणं जिवावर बेतलं; ४ तरुणींचा खड्ड्यात पडून मृत्यू

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -