घरदेश-विदेशजडेजाच्या पत्नीला पोलिसाकडून धक्काबुक्की , तक्रारीनंतर आरोपी पोलिस अटकेत

जडेजाच्या पत्नीला पोलिसाकडून धक्काबुक्की , तक्रारीनंतर आरोपी पोलिस अटकेत

Subscribe

जामनगर – भारतीय क्रिकेट संघ आणि आयपीएलमधील चैन्नईचा खेळाडू रवींद्र जडेजाच्या पत्नीला एका पोलिसाने धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातच्या जामनगरमध्ये पोलिस कॉन्स्टेबल संजय अहिरने जडेजाची पत्नी रिवाबा सोलंकी हिला मारहाण केली.

नक्की झालं काय?
रिवाबा काल संध्याकाळी ७ च्या सुमारास आपल्या कारने शरू सेक्शन रोडवरून जात होती. तेवढ्यात पोलिस मुख्यालयावरून बाइकवर पोलिस कर्मचारी संजय अहिर निघाला. रिवाबाच्या कारची त्याच्या बाइकला धडक बसली. यावर पोलिस कर्मचाऱ्याने वाद घालायला सुरुवात केली. तिचे केस पकडून कारमधून बाहेर खेचले. हे सर्व पाहून लोकांची गर्दी जमू लागली. गर्दी जमताच संजय अहिरने घाबरून तिथून पळ काढला. हल्ल्यानंतर रिवाबा थेट एसपी कार्यालयात पोहोचली आणि आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.

- Advertisement -
रिवाबा जडेजा घटनास्थळी

‘केस पकडून डोकं आपटलं’
‘चिडलेल्या अहिर याने माझे केस पकडून खेचले आणि डोके कारवर आदळले’, असा आरोप रिवाबाने पोलिस तक्रारीत केला आहे. रिवाबाने केलेल्या तक्रारीवरून पोलिस कॉन्स्टेबल संजय अहिर याला निलंबित करण्यात आले असून त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली.

आरोपीचा अटकेपासून वाचण्याचा खटाटोप
घटनेनंतर आरोपी दुर्घटनेत स्वत:ला जखमी असल्याचे भासवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये भरती होण्यासाठी गेला. परंतु कोणतीही दुखापत नसल्याने त्याचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. यानंतर तो फरार झाला. अखेर रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली. जामनगरचे पोलिस अधीक्षक प्रदीप सेजुल यांनी घटनेला दुजोरा दिला आहे. महिलेला पोलिसाने मारहाण करणे अत्यंत गंभीर असल्याचे शेजुल यांनी म्हटले आहे. तसेच आरोपी पोलिसावर कडक कारवाई करु, असेही त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -
चेन्नईचा खेळाडू रवींद्र जडेजा

रवींद्र जडेजाची आज मुंबईत मॅच
काल रात्री उशीरा घडलेल्या या घटनेमुळे रिवाबा आणि त्यांच्या कुटुंबियांना चांगलाच मनःस्ताप झाला आहे. या सर्व घटनेदरम्यान रविंद्र जडेजा मात्र त्याच्या कुटुंबियांसोबत नाहीये. आयपीएलच्या चैन्नई सुपरकिंग्ज संघातील खेळाडू असलेल्या रवींद्रची आज मुंबईत मॅच आहे. त्यामुळे सध्या रवींद्र मुंबईत आहे. आयपीएल सीजनची पहिली सेमिफायनल आज वानखेडे स्टेडियमवर पार पडणार असून धोनीच्या नेतृत्वाखाली हैगराबाद संघाच्या विरोधात हा सामना होणार आहे.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -