घरदेश-विदेशRBIने सिद्धूसारखे नाही तर द्रविडसारखे काम करावे - रघुराम राजन

RBIने सिद्धूसारखे नाही तर द्रविडसारखे काम करावे – रघुराम राजन

Subscribe

रिझर्व्ह बँकेचा माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सध्या केंद्र सरकार आणि आरबीआयमध्ये सुरु असलेल्या वादावर एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. यासाठी त्यांनी क्रिकेटमधील दोन खेळांडूचे उदाहरण दिले आहे. भारताचा माजी क्रिकेटर सिद्धू ज्याप्रमाणे क्रिकेटमधून निर्वृत्त झाल्यानंतर राजकारण सामील झाला, कारण तो चांगला गप्पा मारतो. मात्र आरबीआयने सिद्धू सारखे काम न करता राहुल द्रविडसारखे सयंमाने काम केले पाहीजे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

रघुराम राजन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, शिखर बँकेची भूमिका ही गाडीच्या सीट बेल्टसारखी असते. दुर्घटना रोखण्यासाठी जसा सीट बेल्ट महत्त्वाची भूमिका बजावतो. यासोबतच रघुराम राजन यांनी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्यामधील मतभेद, आरबीआयवर कलम ७ चा होत असलेला वापर, गैर बँकिंग वित्तीय कंपन्यावरील संकट (एनबीएफसी), केंद्रीय सूचना आयोगाची नोटीस आणि आरबीआय बोर्डसहीत अनेक मुद्द्यावर त्यांनी आपली मते व्यक्त केली.

- Advertisement -

सध्या डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होत चालली आहे. यावरही राजन यांनी भाष्य केले असून ते म्हणाले की, रुपयाचा योग्य स्तर काय असावा याबाबत मी काही सांगू शकत नाही. मात्र रुपयाच्या किमतीवर लक्ष देण्यापेक्षा आपण मुद्द्यावर लक्ष द्यायला पाहीजे.

केंद्र सरकारने आरबीआय बँकेवर कलम सात लागू केले आहे. त्यामुळे दोघांमधील संबंध ताणले गेले आहेत. आरबीआय ही सार्वभौम संस्था असून त्यांच्यावर काही विशेष जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. केंद्राने आरबीआयच्या स्वायत्तेतचा सन्मान करायला हवा. अर्थव्यवस्थे स्थिर ठेवण्याची जबाबदारी आरबीआयचे असल्यामुळे केंद्र सरकार आणि आरबीआयने एकमेकांबरोबर काम केले पाहीजे, अशी भावना राजन यांनी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -