घरदेश-विदेशRBI Credit Policy : रेपो रेट 'जैसे थे'; आरबीआयकडून कर्जदारांना दिलासा

RBI Credit Policy : रेपो रेट ‘जैसे थे’; आरबीआयकडून कर्जदारांना दिलासा

Subscribe

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. तीन दिवसीय चलनविषयक धोरण समितीच्या (Monetary Policy Committee) बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी प्रसार माध्यमांना ही माहिती दिली. यावेळी आरबीआयने रेपो दर 6.50 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. सलग सहाव्यांदा रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही.

रिझर्व्ह बँकेने जवळपास वर्षभरापासून रेपो दर 6.5 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. फेब्रुवारी 2023मध्ये ते 6.25 टक्क्यांवरून 6.5 टक्के करण्यात आले होते. त्यापूर्वी, मे 2022 ते फेब्रुवारी 2023 या काळात रेपो दरात 250 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली होती. एमपीसीच्या बैठकीत उपस्थित सहापैकी पाच सदस्यांनी रेपो दरात बदल न करण्याचे मत मांडले.

- Advertisement -

पतधोरण आढाव्याची माहिती देताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, जागतिक स्तरावर अनिश्चिततेचे वातावरण असूनही देशाची अर्थव्यवस्था मजबूत दिसत आहे. एकीकडे आर्थिक विकास होत आहे, तर दुसरीकडे चलनवाढ कमी झाली आहे. महागाई नियंत्रित ठेवणे आणि आर्थिक वाढीला चालना देणे यादृष्टीने चलनविषयक धोरण समितीने अनुकूल भूमिका कायम ठेवली आहे, असेही ते म्हणाले.

देशाच्या अर्थव्यवस्थेची वाढ गतिमान होत आहे आणि तो बहुतांश विश्लेषकांचे अंदाज फोल ठरवत आहे. 2024मध्ये जागतिक विकास दर स्थिर राहण्याची अपेक्षा आहे, असे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले. रेपो दरासोबतच रिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे. एमएसएफ (Marginal Standing Facility) दर आणि बँक दर 6.75% वर राहतात. तर, एसडीएफ (Standing Deposit Facility) दर 6.25 टक्क्यांवर स्थिर आहे.

- Advertisement -

रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?

RBI (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) ज्या दराने व्यापारी बँका आणि इतर बँकांना कर्ज देते त्याला रेपो दर म्हणतात. रेपो दर कमी म्हणजे बँकांकडून मिळणारी सर्व प्रकारची कर्जे स्वस्त होतील. यामुळे तुमच्या ठेवींवरील व्याजदरही वाढतो. बँकांनी आरबीआयमध्ये जमा केलेल्या पैशावर ज्या दराने व्याज मिळते त्याला रिव्हर्स रेपो दर म्हणतात. बँकांकडे असलेली अतिरिक्त रोकड रिझर्व्ह बँकेकडे जमा केली जाते. यावर बँकांना व्याजही मिळते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -