घरअर्थजगत३१ ऑगस्टपर्यंत ईएमआयमध्ये सवलत; जाणून घ्या ७ महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे

३१ ऑगस्टपर्यंत ईएमआयमध्ये सवलत; जाणून घ्या ७ महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे

Subscribe

रिझर्व्ह बँकेने ईएमआयबाबत ३१ ऑगस्टपर्यंत सवलत दिली आहे.

लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यापासून आरबीआय ईएमआयबाबत सवलत देणार असा अंदाज वर्तवला जात होता. अंदाजानुसार रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा ही सुविधा ३१ ऑगस्टपर्यंत वाढविली आहे. चला आरबीआयच्या या निर्णयाशी संबंधित काही महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया…

१. आरबीआयच्या घोषणेचा अर्थ काय?

- Advertisement -

उत्तर – केंद्रीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा कर्जाचा ईएमआय न भरण्याचा कालावधी वाढवला आहे. याचा अर्थ असा की आपण एकूण ६ महिन्यांसाठी वैयक्तिक, वाहन, घर, व्यवसाय कर्ज किंवा क्रेडिट कार्डचा मासिक हप्ता (ईएमआय) भरणे टाळू शकता.

२७ मार्च रोजी प्रथमच आरबीआयने बँकांना ईएमआय पेमेंट्स म्हणजे मोरेटोरियम पुढे ढकलण्यास सांगितलं होतं. यानंतर बँकांनी आपल्या ग्राहकांना ईएमआय पेमेंट ३ महिन्यांसाठी पुढे ढकलण्यास सूट दिली आहे. आता ही सूट अतिरिक्त ३ महिने अर्थात ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे.

- Advertisement -

२. आता तुम्हाला काय करावं लागणार?

उत्तर- जर आपण आधीपासून मॉरेटोरियम सुविधेचा लाभ घेत असाल तर त्यास अतिरिक्त तीन महिन्यांसाठी मुदतवाढ घ्या. त्याच वेळी, जर आपल्याला आता या सुविधेचा फायदा घ्यायचा असेल तर आपल्या बँकेशी संपर्क साधा.


हेही वाचा – बंगालनंतर ओडिशाला केंद्राची मदत, ५०० कोटी देण्याची पंतप्रधानांची घोषणा


३. ईएमआय मॉरेटोरियम सुविधा घेणं योग्य आहे का?

उत्तर – कोरोना संकटात असे बरेच लोक आहेत ज्यांनी नोकर्‍या गमावल्या आहेत किंवा पगारात कपात करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त काही लोकांनी त्यांच्या व्यवसायासाठी कर्ज घेतलं असून ते आता रखडलं आहे. अशा लोकांना ईएमआय मॉरेटोरियमची सुविधा मिळू शकते. याद्वारे आपण आपला मासिक हप्ता पुढे ढकलू शकता आणि तत्काळ पैशांची कमतरता दूर करू शकता. परंतु ज्यांच्या उत्पन्नावर काही फरक पडला नाही त्यांनी त्यांचा ईएमआय वेळेवर भरला पाहिजे.

४. ईएमआय मॉरेटोरियम सुविधा असल्यास त्याचा फायदा होईल की तोटा?

उत्तर- जर तुम्ही ईएमआय मॉरेटोरियमची सुविधा घेत असाल तर तुम्हाला त्वरित दिलासा मिळेल. परंतु दीर्घ कालावधीत आपल्याला व्याज म्हणून अतिरिक्त किंमत मोजावी लागेल. वास्तविक, स्थगित अवधी दरम्यान थकबाकी असलेल्यांवर व्याज राहील. म्हणजे वाढीव व्याज आपल्याकडून अतिरिक्त ईएमआयद्वारे आकारलं जाईल.

५. तुमचं किती नुकसान होईल?

उत्तर- ईएमआय मॉरेटोरियम सुविधेचा लाभ घेऊन तुम्हाला अतिरिक्त रक्कम भरावी लागेल. जर तुम्ही एसबीआय कडून ३० लाख रुपयांचं गृह कर्ज घेतलं असेल आणि परतफेड कालावधी १५ वर्षे बाकी असेल. अशा परिस्थितीत आपण ३ महिन्यांच्या मुदतीचा पर्याय निवडल्यास तुम्हाला २.३४ लाख रुपये अतिरिक्त व्याज द्यावं लागेल, जे ८ ईएमआयइतकं असेल. त्याचप्रमाणे तुम्ही ६ लाख रुपयांचे कारचं कर्ज घेतलं आहे आणि तुमच्याकडे परतफेडीसाठी ५४ महिने शिल्लक राहिल्यास तुम्हाला १९ हजार रुपये अतिरिक्त व्याज द्यावं लागेल, जे १.५ अतिरिक्त ईएमआयच्या बरोबर असेल.

६. ही जास्तीची रक्कम एकत्रितपणे द्यावी लागेल का?

उत्तर- नाही, ईएमआय मॉरेटोरियमच्या सुविधेसह बँका देखील ग्राहकांना काही पर्याय देत आहेत. पहिला पर्याय म्हणजे त्या ग्राहकांसाठी जे मार्चपासून या सुविधेचा लाभ घेत आहेत, अशा ग्राहकांनी तारखेच्या कालावधीत हप्ता भरला नाही तर जून महिन्यात एकरकमी व्याज भरता येते.

शिवाय, एक पर्याय देखील आहे की यावेळी जे काही व्याज झालं आहे, ते कर्जाच्या उर्वरित रकमेमध्ये जोडावं. उर्वरित ईएमआयमध्ये ते समानपणे विभागलं गेलं पाहिजे. यामुळे तुमचा ईएमआय वाढेल पण कर्जाच्या परतफेड कालावधीत कोणताही बदल होणार नाही. ईएमआय स्थिर ठेवणे आणि कर्जाची मुदत वाढविणे हा आणखी एक पर्याय आहे. समजा तुम्हाला तुमच्या कर्जाची १२ वर्ष ईएमआय द्यावा लागेल तर तुम्ही ही मुदत वाढवू शकता. या कालावधीत ईएमआय स्थिर राहील, परंतु कर्जाची मुदत संपल्यानंतर तुम्हाला अतिरिक्त महिन्यांत हप्ते भरावे लागतील.

७. तुम्हाला ही सुविधा नको असेल तर तुम्ही काय करावं?

उत्तर – अशा परिस्थितीत सर्वसाधारणपणे ईएमआय पूर्वीप्रमाणेच कापू द्या. जर काही कारणास्तव तुमचा ईएमआय वजा केला नसेल तर बँकेशी संपर्क साधा आणि कारण विचारा. जर तुम्हाला ईएमआय मॉरेटोरियमची सुविधा घ्यायची असेल तर तुम्हाला तुमच्या बँकेशी संपर्क साधावा लागेल. याशिवाय बँकेच्या वेबसाइट, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारेही मदत घेता येईल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -