घरदेश-विदेशPM Svanidhi Yojana गॅरंटीशिवाय मिळणार सहज कर्ज, RBI ची खास योजना

PM Svanidhi Yojana गॅरंटीशिवाय मिळणार सहज कर्ज, RBI ची खास योजना

Subscribe

रस्त्यांवर तसेच फुटपाथवर वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांना आपला व्यवसाय सुरळीत चालवण्यासाठी PM Svanidhi Yojana अंतर्गत आता अगदी सहजरित्या कर्ज उपलब्ध होणार आहे. कारण रिझर्व्ह बँकेने पॉइंट ऑफ सेल (POS) सारख्या सुविधांना प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्या आणि दुसऱ्या श्रेणीतील केंद्राच्या पंतप्रधान स्वानिधी योजनेअंतर्गत रस्ते आणि फुटपाथ वस्तू विक्रेत्यांना PIDF योजनेचा फायदा देण्यासाठी योजना आखली आहे. PM Svanidhi Yojana ही योजना खास करुन रस्ते आणि फुटपाथवरील वस्तू विक्रेत्यांसाठी सुरु करण्यात आली आहे.

जानेवारी २०२१ पासून सुरु झाली योजना

PM Svanidhi Yojana : तिसऱ्या ते सहाव्या श्रेणीतील केंद्राच्या डिजीटल पेमेंट्ला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ३० लाख नवे पीओएस तयार करण्याच्या उद्देशाने पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड (पीआयडीएफ) योजना सुरु करण्यात आली. या योजनेसाठी ३४५ कोटी रुपये इतका निधी निश्चित झाला असून जानेवारी महिन्यात या योजनेची सुरुवात झाली. रस्ते आणि फुटपाथवरील विक्रेत्यांसाठी प्रथम आणि द्वितीय श्रेणीतील काही मोजक्या केंद्रावर या योजनेचा फायदा उपलब्ध करु देण्यात आला आहे.

- Advertisement -

 रस्ते आणि फुटपाथ विक्रेत्यांसाठी आत्मनिर्भर निधी

PM Svanidhi Yojana : कोरोना महामारीमुळे कमावण्याचे साधन गमावणाऱ्या रस्त्यांवरील लहान उद्योजकांना मदत करण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री रस्ते आणि फुटपाथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजना सुरु करण्यात आली. या योजनेअंतर्गत या विक्रेत्यांना कोणत्याही गॅरंटीशिवाय १० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. देशभरातील सुमारे ५० लाख विक्रेत्यांना या योजनेचा फायदा पोहचवण्याचे केंद्राचे लक्ष्य आहे.

तिसऱ्या ते सहाव्या श्रेणीतील लहान विक्रेत्यांना मिळणार फायदा

रिझर्व्ह बँकेने म्हटले की, पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत पहिल्या आणि द्वितीय श्रेणीतील केंद्रांवर ओळखप्राप्त रस्ते आणि फुटपाथ विक्रेत्यांना पीआयडीएफ योजनेचे लाभार्थी बनवले जाईल. आता या योजनेअंतर्गत तिसऱ्या ते सहाव्या श्रेणीतील केंद्रांतील लहान विक्रेत्यांनाही योजनेचा फायदा मिळेल.

- Advertisement -

लस घेतलेल्या मातेच्या दुधात पुरेश्या अँटीबॉडीज, बाळाचेही होतेय कोरोनापासून संरक्षण- रिसर्च


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -