घरदेश-विदेशRBI Governor: नोटांवर सही असणाऱ्या गव्हर्नर शक्तीकांत दास यांना किती आहे पगार?

RBI Governor: नोटांवर सही असणाऱ्या गव्हर्नर शक्तीकांत दास यांना किती आहे पगार?

Subscribe

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) चलनातून पुन्हा एकदा नोटा बाद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे आरबीआय खूपच चर्चेत आले. पण तुम्हाला माहित आहे का, ज्यांच्या स्वाक्षरीशिवाय नोटा छापल्या जातात आणि नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला जातो त्या आरबीआय गव्हर्नरचा पगार किती आणि त्यांना पगाशिवाय आणखी कोणत्या सुविधा मिळतात. जर माहित नसेल तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सध्याचे आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांना दर महिन्याला जवळपास 2.87 लाख रुपये पगार मिळतो. आरटीआयमधून मिळालेल्या माहितीनुसार, शक्तीकांत दास यांच्या आधी आरबीआयचे गव्हर्नर राहिलेले उर्जित पटेल यांना महिन्याला अडीच लाख रुपये पगार मिळत होता. गव्हर्नरसोबत आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरला दर महिन्याला 2.24 लाख रुपेय पगार मिळतो आणि कार्यकार्य संचालकांना 2.16 लाख रुपये मिळतो. (RBI Governor: How much is the salary of Governor Shaktikanta Das who signs the notes?)

- Advertisement -

पगारासोबत मिळतात या सुविधा
आयबीआय गव्हर्नरला पगाराशिवाय शासनाकडून घर, गाडी,  ड्राईव्हर आणि इतर महत्त्वाच्या सोयीसुविधा दिल्या जातात. आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांची ही दुसरी टर्म आहे. नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर दुसरी टर्म मिळवणारे शक्तिकांत दास हे रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर आहेत. १९८० च्या बॅचचे आयएएस असलेल्या दास यांनी 10 डिसेंबर 2018 रोजी या पदाची सूत्रे हाती घेतली. 2021 मध्ये त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांसाठी वाढवण्यात आला आहे.

शक्तीकांत दास यांच्याविषयी
शक्तिकांत दास हे मूळचे ओडिशाचे आहेत. त्यांचा जन्म 26 फेब्रुवारी 1957 रोजी भुवनेश्वर, ओडिशा याठिकाणी झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून इतिहासामध्ये एमए केले आहे. यानंतर ते यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. ते 1980 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. गुंतागुंतीच्या मुद्द्यांवर एकमत निर्माण करण्यावर विश्वास ठेवणारे अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. आरबीआय गव्हर्नर होण्याआधी 2008 मध्ये त्यांना पहिल्यांदा वित्त मंत्रालय संयुक्त सचिव हे पद देण्यात आले होते.

- Advertisement -

उर्जित पटेल यांच्या जागी नियुक्ती
माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या जागी शक्तिकांत दास यांची 2018 मध्ये नियुक्ती करण्यात आली. उर्जित पटेल यांची सप्टेंबर 2016 मध्ये रिझर्व्ह बँकेचे २४ वे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आले होते, परंतु त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांनी वैयक्तिक कारणास्तव गव्हर्नर पदाचा अचानक राजीनामा दिला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -