घरCORONA UPDATERBI Relief: कर्जावरील व्याज दर घटणार, EMI मध्ये आणखी तीन महिन्यांची सूट

RBI Relief: कर्जावरील व्याज दर घटणार, EMI मध्ये आणखी तीन महिन्यांची सूट

Subscribe

देशात कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊन घोषित केल्यामुळे आर्थिक संकट देशावर कोसळले आहे. यासाठी पंतप्रधानांनी २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी या पॅकेजची फोड करुन सांगितली होती. त्यानंतर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज पत्रकार परिषद घेऊन रेपो रेट दरात .४० ची घट केली आहे. रेपो रेट ४.४ वरुन आता ४ टक्क्यावर आणण्यात आला आहे. यामुळे सामान्यांना दिलासा मिळणार असून कर्जावरील व्याज कमी होणार आहे.

- Advertisement -

कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून दिलासा मिळण्यासाठी रिझर्व्ह बँकेने EMI भरण्यापासून आणखी तीन महिने सवलत दिली आहे. यापूर्वी मार्च, एप्रिल, जून महिन्यासाठी EMI न भरण्याची मुभा दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा जून, जुलै आणि ऑगस्ट असे तीन महिने कर्जाचे हप्ते न भरण्याची सवलत देण्यात आली आहे.

- Advertisement -

 

लॉकडाऊनदरम्यान आरबीआयने दुसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कपात केली आहे. याच्याआधी २७ मार्च रोजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटमध्ये ०.७५ टक्क्यांची कपात केली होती. त्यानंतर बँकांनी कर्जावरील व्याज कमी केले होते. रेपो रेटमध्ये कपात करत असताना आरबीआयने रिव्हर्स रेपो रेटमध्ये देखील कपात केली आहे. ३.७५ टक्क्यांवरून आता ३.३५ टक्क्यांवर रिवर्स रेपो रेट आणला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -