घरCORONA UPDATEअर्थव्यवस्था किती मजबूत आहे हे कोरोनाच्या काळात आपण दाखवून दिलं - RBI

अर्थव्यवस्था किती मजबूत आहे हे कोरोनाच्या काळात आपण दाखवून दिलं – RBI

Subscribe

सध्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यासाठी अर्थव्यवस्थेच्या वृद्धीलाच रिझर्व्ह बँकेचं प्राधान्य आहे. अशी माहिती ‘एसीबीय बँकिंग अँड इकॉनॉमिक्स कॉनक्लेव्ह’ या आयोजित व्हर्च्युअल कॉन्फरन्समध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी दिली. कोरोना हे १०० वर्षांतील सर्वात वाईट आरोग्य आणि आर्थिक संकट असल्याचं ते म्हणाले.

- Advertisement -

गव्हर्नर शक्तिकांता दास पुढे बोलताना म्हणाले की, आपली अर्थव्यवस्था आणि आर्थिक प्रणाली किती मजबूत आहे हे या कोरोनाच्या काळात आपण दाखवून दिलं आहे. नोकरीपासून दैनंदिन कामांवरही त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. आपल्या आरोग्य आणि अर्थव्यवस्थेवरील शतकातील हे सर्वात वाईट संकट आहे. तसंच ग्लोबल चेन व्हॅल्यू, वर्ल्ड ऑर्डर आणि जगभरातील कामगारांवरही या मोठा परिणाम झाल्याचे ते म्हणाले. रिझर्व्ह बँकेचं विकासालाच प्राधान्य आहे. तसंच आर्थिक स्थिरताही तितकीच महत्त्वाची आहे. करोना महामारीमुळे एनपीएमध्ये वाढ होईल आणि भांडवलातही घट होईल.” असंही ते यावेळी म्हणाले. लॉकडाउननंतर हळूहळू निर्बंध उठवले जात असल्यानं त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. असे ते म्हणाले.

- Advertisement -

रिझर्व्ह बँक हळूहळू रेपो दरात आणखी कपात करेल असा निर्णय मॉनिटरींग कमिटीनं घेतला आहे. यानुसार फेब्रुवारी २०१९ ते येणाऱ्या काळापर्यंत रेपो दरात एकूण २५० बेसिस पॉईंट्सची कपात केली जाणार असल्याची माहिती दास यांनी दिली.


हे ही वाचा – ‘वेळ आली तर शस्त्र हाती घेईन’, विकास दुबेच्या पत्नीचा इशारा!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -