घरट्रेंडिंगRBI चे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा?

RBI चे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा?

Subscribe

RBI चे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यामुळे मोदी सरकरच्या अडचणीत वाढ होईल अशी शक्यताही वर्तवली जात आहे.

केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेदरम्यान स्वायत्ततेच्या प्रश्नावरुन वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, RBI चे गव्हर्नर उर्जित पटेल राजीनामा देणार असल्याची चर्चा होते आहे. दरम्यान, उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यामुळे मोदी सरकरच्या अडचणीत वाढ होईल अशी शक्यताही वर्तवली जात आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नुकताच रिझर्व्ह बँकेच्या धोरणावर निशाणा साधत, कर्जवाटपाच्या मुद्द्यावरुन त्यांच्यावर टीका केली होती. ‘बँकांकडून २००८ ते २०१४ या कालावधीमध्ये झालेल्या भरमसाट कर्जवाटपावर नियंत्रँ ठेवण्यामध्ये मध्यवर्ती बॅंकेची भूमिका अपयशी ठरली’ अशी टीका जेटली यांनी केली होती. याशिवाय आज भेडसावत असलेल्या बुडीत कर्जाच्या समस्येलासुद्धा RBI जबाबदार असल्याचं वक्तव्य जेटली यांनी केलं होतं. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच मुंबईत झालेल्या ए.डी. श्रॉफ या व्याख्यानमालेमध्ये, आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी ‘मध्यवर्ती बँक अर्थव्यवस्थेबाबक कायम दीर्घकालीन विचार करते’ अशी टीका केली होती. या सगळ्यावरुनच केंद्र सरकार आणि आरबीआय यांच्या तणावपूर्ण संबंधांचा अंदाज लावला जाऊ शकतो.


वाचा: SBI चा मोठा निर्णय; ‘या’ सेवेवर लागणार निर्बंध

अशातच आता RBI चे गव्हर्नर उर्जित पटेल राजीनामा देणार असल्याच्या चर्चांमुळे विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. सीएनबीसी टीव्ही १८ या वृत्तवाहिनीने सरकारच्या धोरणामुळे नाराज असलेले उर्जित पटेल राजीनामा देणार असल्याचे वृत्त जाहीर केले आहे. या वृत्तात RBI आणि केंद्र सरकारमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पटेल यांनी राजीनामा देण्याचा पर्याय खुला ठेवल्याचे म्हणण्यात आले आहे. तर दुसरीकडे ‘उर्जित पटेल हे राजीनामा देणार नाहीत’, असं मुंबई मिरर या इंग्रजी वृत्तपत्राने म्हटलं आहे. त्यामुळे आता उर्जित पटेल नेमकं राजीनामा देणाक की नाही? हा प्रश्न उपस्थित राहिला आहे. दरम्यान, याविषयी स्वत: उर्जित पटेल यांनी याविषयी अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.

राजीनामा देणार?


राजीनामा देणार नाहीत?

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -