घरदेश-विदेशरिझर्व्ह बँकेत भरती, २१ सप्टेंबरपासून अर्जनोंदणी सुरू!

रिझर्व्ह बँकेत भरती, २१ सप्टेंबरपासून अर्जनोंदणी सुरू!

Subscribe

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बी ग्रेड पदांसाठी परीक्षेसंदर्भात परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. २१ सप्टेंबरपासून ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात होणार आहे.

भारतातल्या सर्व बँकांची शिखर बँक अर्थात प्रमुख बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये दुय्यम श्रेणी अर्थात ग्रेड बी (जनरल) श्रेणीतल्या डीआर, डीईपीआर आणि डीएसआयएम या पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. दरवर्षी या पदांसाठी ही भरती केली जाते. यासंदर्भात परिपत्रक काढून ही घोषणा करण्यात आली आहे. यासाठी पुढच्या आठवड्यात म्हणजेच २१ सप्टेंबरपासून ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात होणार आहे. पुढच्या महिन्यात ११ ऑक्टोबर पर्यंत हे अर्ज विहीत नमुन्यामध्ये भरून देणं आवश्यक आहे. आरबीआय ग्रेड बी परीक्षा २०१९च्या माध्यमातून या तिनही जागांसाठी भरती केली जाणार आहे. ९ नोव्हेंबरला ही परीक्षा होणार असून त्याचा दुसरा टप्पा १ डिसेंबर तर तिसरा टप्पा २ डिसेंबर रोजी होणार आहे.

कशी असेल निवड प्रक्रिया?

देशभरात आरबीआयच्या शाखांमध्ये या पदावरील व्यक्तींची नेमणूक केली जाते. त्यासाठीच दरवर्षी परीक्षा घेऊन उमेदवारांची निवडप्रक्रिया राबवली जाते. ही परीक्षा ऑनलाईन असून दोन विभागांमध्ये घेतली जाईल. यामध्ये पेपर १ आणि पेपर २ अशी पद्धत असेल. पेपर १मध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराला पेपर २ साठी बोलावलं जाईल. या दोन्ही पेपरमध्ये कट ऑफ गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यात मुलाखतीसाठी बोलावलं जाईल.

- Advertisement -

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्जनोंदणी सुरू – २१ सप्टेंबर
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ ऑक्टोबर
आरबीआय ग्रेड बी परीक्षा फेज १ – ९ नोव्हेंबर
आरबीआय ग्रेड बी परीक्षा फेज २ – १ डिसेंबर
फेज २ डीईपीआर आणि डीएसआयएम परीक्षा – २ डिसेंबर
फेज २ निकाल – तारीख परीक्षेनंतर जाहीर करण्यात येईल
मुलाखत – परीक्षेनंतर तारीख जाहीर करण्यात येईल

किती पदांसाठी निवड प्रक्रिया?

बी ग्रेड डीआर – सामान्य श्रेणी १५६ जागा
बी ग्रेड डीआर – डीईपीआर २० जागा
बी ग्रेड डीआर – डीएसआयएम २३ जागा

- Advertisement -

सविस्तर माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा – https://opportunities.rbi.org.in/Scripts/bs_viewcontent.aspx?Id=3503

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -