घरअर्थजगतRBI चा सामान्यांना 'जोर का झटका', रेपो दरात वाढ, EMI पुन्हा वाढणार, 6.50 टक्के...

RBI चा सामान्यांना ‘जोर का झटका’, रेपो दरात वाढ, EMI पुन्हा वाढणार, 6.50 टक्के नवा दर

Subscribe

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बुधवारी यंदाचं ( 8 फेब्रुवारी) पतधोरण जाहीर केलं आहे. या नव्या पतधोरणामुळे आता सर्वसामान्यांना ‘जोर का झटका’ लागला आहे. आरबीआयने यंदा रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांनी वाढ केल्याची घोषणा केली आहे. रेपो रेटमध्ये सलग सहाव्यांदा दरवाढ केली आहे. यामुळे रेपो रेट आता 6.50 टक्के झाला आहे. या धोरणाची घोषणा करताना आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, महागाई हा देशातील चिंतेचा विषय आहे. रेपो रेट वाढल्याने गृहकर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्जाच्या EMI वर परिणार होणार आहे.

- Advertisement -

देशात महागाईचा दर घसरत असतानाही आरबीआयने रेपो रेट सलग सहाव्यांदा वाढवला आहे. यामुळे रेपो रेट 6.25 टक्क्यांवरून 6.50 टक्क्यांवर पोहचला आहे. यामुळे होम लोन, पर्सनल लोन आणि ऑटो लोनपर्यंतचे सर्व काही महागणार आहे. कारण या सर्व लोनवर ग्राहकांना जास्त EMI भरावा लागेल. देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आरबीआय एमपीसीची बैठक झाली. या बैठकीत घेतलेल्या काही निर्णयांमुळे नागरिकांना अधिकचा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -