देशातील या 2 बड्या बँकांवर रिझर्व्ह बँकेची कारवाई, ठोठावला 1 कोटींचा दंड

rbi imposes rs 1 cr penalty each on kotak mahindra and indusind bank

भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) खाजगी क्षेत्रातील दोन मोठ्या बँकांना मोठी कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने या दोन बड्या बँकांना 1 कोटींचा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने कोटक महिंद्रा बँक लिमिटेडला 1.05 कोटी रुपये आणि इंडसइंड बँकेला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीत, आरबीआयने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन न केल्याने ही दंडाची कारवाई करण्यात आली आहे. RBI ने 29 जून 2022 च्या आदेशात कोटक महिंद्रा बँकेला बँकिंग नियमांच्या तरतुदींचे उल्लंघन आणि ग्राहक संरक्षण मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याबद्दल 1.05 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

बँकिंग नियामकाच्या म्हणण्यानुसार, कोटक महिंद्रा बँक लिमिटेडवर बँकिंग नियमन कायदा, १९४९ (अधिनियम) च्या कलम २६अ मधील उप-कलम (२) च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड योजनेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल बँकेला हा दंड ठोठावण्यात आला आहे.

नियमांचे पालन न केल्यामुळे इंडसइंड बँकेवरही अशीच कारवाई करण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले. RBI ने नो युवर कस्टमर (KYC) दिशानिर्देश, 2016 साठी जारी केलेल्या काही निर्देशांचे पालन करण्यात बँकेने निष्काळजीपणा केला आहे, ज्यामुळे बँकेला दंड आकारण्यात आला आहे. आरबीआयच्या या कारवाईमुळे ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर परिणाम होणार नाही.


सरकार चालवताना शिंदेंच्या पाठीशी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही