घरअर्थजगतबँक ग्राहकांसाठी RTGS बद्दल आनंददायी बातमी

बँक ग्राहकांसाठी RTGS बद्दल आनंददायी बातमी

Subscribe

तुम्ही दुसऱ्या खात्यात आरटीजीएसने पैसे ट्रान्सफर करतात का? तर तुमच्यासाठी ही एक आनंददायी बातमी आहे. रिझर्व बँकेने आता आरटीजीएसद्वारे पैसे दुसऱ्या खात्यात जमा करण्याची वेळ वाढवली आहे. पूर्वी केवळ ४ पर्यंतच या पद्धतीने पैसे जमा करता यायचे, मात्र आता १ जून पासून त्यात दीड तासांची वाढ होऊन सायंकाळी ६ वाजेपर्यंत आरटीजीएस(रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट) ने पैसे दुसऱ्याच्या खात्यात जमा करता येणार आहे.

आरटीजीएसचा उपयोग प्रामुख्याने मोठ्या रकमेच्या हस्तांतरणासाठी होतो. कमीत कमी २ लाख रुपये या प्रणालीने पाठवता येतात, तर जास्तीत जास्त कितीही पैसे पाठविता येतात. त्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळे अनेक आस्थापना, दुकाने, कार्यालये यांच्यासाठी ही प्रणाली लाभदायक ठरते. त्यासाठी सध्या दुपारी साडेचारपर्यंतचीच कालमर्यादा आहे. आता त्यात दीड तासांची वाढ होऊन सायंकाळी ६ पर्यंत वाढविली असल्याचे रिझर्व बँकेने काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

- Advertisement -

एक जूनपासून वेळेची वाढीव मर्यादा कार्यान्वयित होणार आहे. दरम्यान आरटीजीएस प्रमाणेच पैसे बँक खात्यातून हस्तांतरीत करण्यासाठी नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर (एनईएफटी) चा वापर केला जातो. किती पैसे पाठवावेत यासाठी एनईएफटीत कोणतीही मर्यादा नाही. याशिवाय अलिकडेच युपीआय चा वापरही वाढत आहे. मोबाईलमधून थेट बँक खात्यात तत्काळ पैसे हस्तांतर करण्याची ही डिजिटल प्रणाली लहान रकमांसाठी सध्या लोकप्रिय आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -