RBI Monetary Policy : आरबीआयचा ग्राहकांना दिलासा, IMPS ५ लाखांचा व्यवहार तर रेपो रेट जैसे थे

ईएमआयमध्ये तुर्तास कोणताही बदल होणार नाही आहे.

RBI Monetary Policy reverse repo rate not changed IMPS online money transfer 5 lakh
RBI Monetary Policy : आरबीआयचा ग्राहकांना दिलासा, IMPS ५ लाखांचा व्यवहार तर रेपो रेट जैसे थे

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गवर्नर शक्तिकांत दास यांनी देशातील ग्राहकांना दिलासा दिला आहे. महागाईच्या आणि सणासुदीच्या ऐनवेळी रेपो रेटमध्ये बदल करण्यत आला नसून जैसे थे ठेवण्यात आला आहे. तर आयएमपीएस (IMPS) म्हणजेच तात्काळ मोबाईलद्वारे पैसे पाठवण्याच्या मर्यादेते वाढ करण्यात आली आहे. पुर्वी २ लाख रुपये पाठवण्याची मर्यादा होती ती आता ५ लाख करुन ग्राहकांना दिलासा दिला आहे. तर रेपो रेटमध्ये (REPO RATE) बदल न केल्यामुळे काही ग्राहकांचा हिरमोडही झाला आहे. सणासुदीच्या काळात व्याजदरात कपात केल्याने दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती परंतु तसा कोणता निर्णय घेण्यात आला नसून मागच्यावेळी असलेला व्याजरच कायम ठेवण्यात आला आहे.

आरबीआयची मागील ३ दिवसांपासून आढावा बैठक सुरु होती. आरबीआयने या आढावा बैठकीत देशातील महागाईवर कशी मात करता येईल यावर चर्चा करुन काही निर्णय घेतले आहेत. यामध्ये सलग ८ व्या वेळी आरबीआयने रेपो रेट कायम ठेवला आहे. सध्या रेपो रेट ४ टक्क्यांवर तर रिव्हर्स रेपो रेटचा दर ३.३५ ठेवण्यात आला आहे. रेपो रेटमध्ये बदल न केल्यामुळे बँकांना आणि ग्राहकांना दिलासा मिळाला आहे कारण ईएमआयमध्ये तुर्तास कोणताही बदल होणार नाही आहे.

देशात मागील दीड वर्षांपासून कोरोनाचे संकट असल्यामुळे आर्थिक स्थिती खालावली आणि महागाईचा भडका उडाला आहे. महागाईवर मात करण्यासाठी आरबीआयकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. सणासुदीच्या काळात रेपो रेटमध्ये घट करुन दिलासा देईल असे ग्राहकांना वाटत होते परंतु तसा कोणताही निर्णय न घेतल्यामुळे ग्राहकांचा हिरमोड झाला आहे. रेपो रेटमध्ये घट करण्यात आली असतील तर ईएमआयमध्ये घट झाली असती. सध्या व्याजर खालच्या पातळीवरच असून बँकेकडूनही खालच्या दरानेच लोन देण्यात येत असल्याचे तज्ञांनी म्हटलं आहे.

IMPS द्वारे ५ लाखांच्या व्यवहाराची मुभा

आरबीआयने बैठकीत आयएमपीएसमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आयएमपीएस म्हणजे मोबाईलद्वारे आठवड्याचे सात दिवस आणि २४ तास ग्राहकर पुर्वी २ लाखांचा व्यवहार करत होते तर आता ही मर्यादा वाढवून ३ लाखांची करण्यात आली आहे. यामुळे आता कधीही कुठेही पैसे पाठवता येणार आहेत. यामध्ये कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही आहे. आरटीजीएस (RTGS) , एनईएफटी (NEFT) आणि आयएमपीएस (IMPS) या पैसे पैठवण्यासाठी देण्यात आलेल्या सुविधा आहेत. पैसे पाठवण्यासाठी संबंधित व्यक्तीचे बँकेत खाते असणे अनिवार्य आहे. तसेच ज्या व्यक्तिला पैसे पाठवण्यात येणार आहेत त्या व्यक्तीच्या खात्याची माहिती असणे अनिवार्य आहेत.


हेही वाचा : UK : भारताचा आक्रमक पवित्रा, यूके प्रवासात क्वारंटाईनची १० दिवसांची अट शिथील