Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग RBI New Rules: उद्यापासून ATM मधून कॅश काढणं होणार महाग! वाचा सविस्तर

RBI New Rules: उद्यापासून ATM मधून कॅश काढणं होणार महाग! वाचा सविस्तर

Related Story

- Advertisement -

ऑगस्ट महिन्यात असे अनेक बदल होणार आहेत, जे दैनंदिन बँकिंग कार्यावर आणि इतर क्षेत्रांवरही परिणाम करणारे असणार आहेत. बँकांमधील व्यवहारांमध्ये १ ऑगस्टपासून अनेक शुल्कात वाढ होणार आहे. जसे की एटीएममधून पैसे काढणं हे नेहमीचेच आहे. मात्र आता डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे काढणे महागणार आहे. उद्यापासून आरबीआयने नवीन नियम लागू केले असून एटीएममधून कॅश काढणं महाग होणार आहे. आरबीआयने सर्व बँकांच्या एटीएमवरील आर्थिक व्यवहारांवर सध्याचे इंटरचेंज शुल्क १५ रुपयांवरुन वाढवून ती १७ रुपये केली जाणार आहे. त्याचप्रमाणे नॉन फायनान्शियल व्यवहारांसाठी असणारी फी ५ रुपयांवरुन ६ रुपये करण्यात आली आहे.

१ ऑगस्टपासून म्हणजेच उद्यापासून आरबीआयचे हे नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जून २०१९ साली आरबीआयने इंडियन बँक असोसिएशनचीच्या प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती, त्या समितीने केलेल्या शिफारसींच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, मेट्रो शहरात महिन्याला ३ ट्रान्जेक्शन आणि इतर शहरात ५ ट्रान्जेक्शन विनाशुल्क देण्यात येणार आहेत. मात्र त्यावरील ट्रान्जेक्शनवर पैसे आकारण्यात येतील असे सांगितले जात आहे.

- Advertisement -

आरबीआयने हा चार्ज आता नव्या चार्ज कॅश रीसायक्लिंग मशिनवरही लावला आहे. हा नियम १ जानेवारी २०२२ पासून लागू करण्यात येणार असल्याचे सांगितले जातेय. तर सध्या बॅंकाकडून ग्राहकांना ५ ट्रान्जेक्शन मोफत देण्यात येत आहेत. परंतु हे ट्रान्जेक्शन वाढले तर ग्राहकाला २० रुपये कस्टमर चार्ज लावण्यात येतो. आता या कस्टमर चार्जमध्ये १ रुपयाची वाढ करण्यात आली असून तो २१ रुपये इतका करण्यात आला आहे.


Rule Changing From 1st August: पुढच्या महिन्यापासून बदलणार ‘हे’ नियम, खिशाला बसणार फटका

- Advertisement -

 

- Advertisement -