घरदेश-विदेशआता सुट्टीच्या दिवशीही खात्यात जमा होणार पगार! १ ऑगस्टपासून नियमांमध्ये होणार बदल

आता सुट्टीच्या दिवशीही खात्यात जमा होणार पगार! १ ऑगस्टपासून नियमांमध्ये होणार बदल

Subscribe

आता सुट्टीच्या दिवशीही खात्यात पगार जमा होणार असल्याने नोकरदार वर्गाला कोणतेही टेन्शन नसणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकतेच असे जाहीर केले की, बल्क पेमेंट सिस्टम नॅशनल ऑटोमॅटिक क्लीयरिंग हाऊस (NACH) ही सुविधा १ ऑगस्ट २०२१ पासून आठवड्यातील सर्व दिवस उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत ही सुविधा फक्त आठवड्यातील कामाच्या दिवशीच उपलब्ध होती, परंतु आता ती सुविधा सात दिवसांसाठी उपलब्ध राहणार असल्याचे सांगितले जात आहे. पेंशन, सब्सिडी आणि पगार ट्रान्सफर करण्यासाठी ही पेमेंट सिस्टम विशेषतः वापरली जाते. आरबीआयच्या मते, १ ऑगस्टपासून या सुविधेचा वापर आठवड्याच्या सातही दिवस करता येणार आहे. ही बल्क पेमेंट सिस्टम सुविधा NACH द्वारे दिली जाते.

आठवड्याच्या शेवटीही मिळणार पगार

१ ऑगस्टपासून होणाऱ्या बदलांमुळे आता तुम्हाला तुमचा पगार, पेन्शन मिळविण्यासाठी कोणत्याही कामाच्या दिवसाची वाट पाहावी लागणार नाही. आरबीआयने जारी केलेल्या अधिकृत नोटीसनुसार, ” १ ऑगस्ट २०२१ पासून, कामकाजाच्या दिवशी उपलब्ध असणारी सर्व सत्रे आठवड्याच्या शेवटी आणि इतर सुट्टीसह सर्व दिवस कार्यरत राहणार आहे” कधीकधी महिन्याचा पहिला दिवस शनिवार व रविवार असतो. ज्यामुळे लोकांना त्यांच्या पगारासाठी सोमवारपर्यंत थांबावे लागते. परंतु, पुढच्या महिन्यापासून लोकांना याची प्रतीक्षा करावी लागणार नसल्याचे आरबीआयकडून सांगितले जात आहे.

- Advertisement -

याशिवाय १ ऑगस्टपासून इतरही अनेक बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक बजेटवर होऊ शकतो. यामध्ये आयसीआयसीआय बँकेचे नियम बदलणार असून एलपीजी गॅसचे नवीन दरही १ ऑगस्टपासून जाहीर केले जातील. एटीएम इंटरचेंज चार्जमध्येही बदल होणार असल्याचे सांगितले जात आहे.

जाणून घ्या, DBT म्हणजे काय?

आरबीआयच्या मते, NACH लाभार्थ्यांसाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBT चा प्रमुख डिजिटल मोड म्हणून वापर करता येणार आहे. सध्या NACH सेवा फक्त अशा दिवसांकरता उपलब्ध आहेत जेव्हा केवळ बँका कार्यरत असते. परंतु १ ऑगस्टपासून ही सुविधा आठवड्याच्या ७ दिवसांसाठी उपलब्ध केली जाणार आहे.

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -