घरटेक-वेकPaytm Payments Bank वर RBI ची कारवाई, नवीन ग्राहक जोडण्यास मनाई, काय...

Paytm Payments Bank वर RBI ची कारवाई, नवीन ग्राहक जोडण्यास मनाई, काय आहे कारण ?

Subscribe

शेअर बाजारात लिस्टिंगनंतर कंपनीचे शेअर्स तोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होत आहे. अशातच आता पेटीएम कंपनीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा झटका दिला आहे.

देशात डिजिटल पेंमेंट सुविधा प्रदान करणारी प्रसिद्ध कंपनी पेटीएम गेल्या काही दिवसांपासून अनेक संकटांचा सामना करत आहे. शेअर बाजारात लिस्टिंगनंतर कंपनीचे शेअर्स तोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होत आहे. अशातच आता पेटीएम कंपनीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा झटका दिला आहे. आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेवर नवीन ग्राहक जोडण्यास मनाई केली आहे.

आरबीआयने पेटीएमला निर्देश दिले आहेत की, पेटीएम पेमेंट्स बँक प्लॅटफॉर्मवर नवीन ग्राहक जोडणे तात्काळ बंद करावे. त्याचप्रमाणे केंद्रीय बँकने दिलेल्या निर्देशानुसार पेटीएमच्या आयटी सिस्टमचे ऑडिट करण्यासाठी एक आयटी ऑडिट फर्म नियुक्त करावी.

- Advertisement -

रिझर्व बँकेच्या म्हणण्यानुसार, आयडी ऑडिट म्हणजे, कंपनीचे आयटी इंफ्रास्ट्रक्चर म्हणजेच सॉफ्टवेअरमध्ये किती ग्राहकांची क्षमता आहे. त्यात काही गडबड आहे का आणि असेल तर ती का आहे ? या सगळ्याची पडताळणी करण्यासाठी आयटी ऑडिट करावे. त्याचप्रमाणे आरबीआयने जारी केलेल्या विधानात म्हटले आहे की, पेटीएम पेमेंट्स बँक सोबत कोणतेही ग्राहक जोडण्यासाठी आरबीआयची परवानगी घ्यावी लागेल. पेटीएमच्या आयटी ऑडिट रिपोर्ट्स आल्यानंतर त्याची पडताळणी होईल आणि पडताळणी झाल्यानंतर पेटीएमला नवीन ग्राहक जोडण्यासाठी परवानगी देण्यात येईल.

 

- Advertisement -

पेटीएमचे शेअर्स पडले

पेटीएमच्या शेअर्समध्ये मागील काही दिवासांपासून घसरण पाहायला मिळत आहे. आज पेटीएमच्या शेअर्समध्ये एक रुपयाची घसरण पाहायला मिळाली. त्यानंतर आज पेटीएमचे शेअर्स ७७४.८० रुपयांवर आले आहे. यावर्षात पेटीएमच्या शेअर्समध्ये ४२ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली आहे. पेटीएमचे शेअर्स एका महिन्यात तब्बल १० वेळा घसरल्याचे पाहायला मिळत आहेत.


हेही वाचा – आता Twitter वरही मिळणार पॉडकास्ट ऑप्शन, लवकरच लाँच होणार नवं फिचर

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -