Saturday, July 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी RBI ची Mastercard वर कारवाई

RBI ची Mastercard वर कारवाई

Related Story

- Advertisement -

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (RBI) ने आज बुधवारी Mastercard मास्टरकार्डवर प्रक्रियेचे अनुपालन न केल्यासाठी कारवाई केली आहेत. आरबीआय मार्फत वेळोवेळी सांगण्यात आलेल्या पेमेंट स्टोरेजच्या बाबतीतील डेटा स्टोरेजच्या मार्गदर्शकांचे पालन न करणे यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. तसेच डेबिट, क्रेडिट किंवा प्रीपेड स्वरूपाच्या अशा कोणत्याही ग्राहकांचा समावेश करण्यासाठी कंपनीला मज्जाव करण्यात आला आहे. येत्या २२ जुलैपासून ही बंधने मास्टरकार्ड आशियासाठी लागू असतील.

- Advertisement -

पण या आदेशाचा कोणताही परिणाम हा विद्यमान ग्राहकांवर नसेल असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. मास्टरकार्ड मार्फत ज्या बॅंकांना कार्ड देण्यात येतात अशा सर्व बॅंकांसाठी हे आदेश लागू असणार आहेत. आरबीआयच्या पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टिम अंतर्गत भाग १७ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. मास्टरकार्ड ही भारतातील पेमेंट सिस्टिम ऑपरेटरपैकी एक अधिकृत कार्ड पुरवणारी अशी कंपनी आहे. आरबीआयच्या मार्गदर्शकांनुसार पेमेंटशी संबंधित सर्व डेटा हा सहा महिन्यांच्या कालावधीत भारतातील स्टोर सिस्टिममध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आरबीआयने सांगितलेले अहवाल वेळोवेळी सादर करणेही अपेक्षित आहे.


 

- Advertisement -