Hathras Gangrape : निर्भया, कोपर्डीची पुनरावृत्ती; हाथरस घटनेने हादरला समाज

पीडितेवर अंत्यसंस्कार

निर्भया, कोपर्डीची पुनरावृत्ती उत्तर प्रदेशात घडली असून एका १९ वर्षीय तरुणीवर अमानुषपणे सामुहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. त्या पीडितेने आपला जीव गमावला असून तिला न्यान मिळाना यासाठी समाजातील प्रत्येक स्तरातून आवाज बुलंद केला जात आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस येथील ही घटनेवर बॉलीवूडसह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत त्या पीडितेच्या मृत्यूवर दुःख व्यक्त केले आहे. त्या पीडितेचा काल मृत्यू झाला असून पोलिसांकडून रातोरात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. दरम्यान, लोकांमधून संतप्त प्रतिक्रिया येत असून उत्तर प्रदेशात निदर्शने आणि घोषणाबाजी केली जात आहे.

पाहुया काही प्रतिक्रिया –

करिना कपूर खान हिने इंस्टाग्रामवर पोस्ट करत पीडितेची माफी मागितली आहे. तसेच तिला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. तसेच अनुष्का शर्मा हिनेही या घटनेचा तीव्र निषेध केला असून, या घटनेने मला दुःख पोहोचवले आहे. अशी क्रूरता करण्यांना कठोर शिक्षा व्हावी, असे म्हटले आहे.

हेही वाचा –

कोरोना काळात महिलांनी असे जपावे आरोग्य