घरदेश-विदेशउत्तराधिकाऱ्याच्या नावाची शिफारस करा, केंद्र सरकारचे सरन्यायाधीश लळित यांना पत्र

उत्तराधिकाऱ्याच्या नावाची शिफारस करा, केंद्र सरकारचे सरन्यायाधीश लळित यांना पत्र

Subscribe

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळित यांना त्यांच्या उत्तराधिकार्‍याचे नाव सुचवण्यास सांगितले आहे. येत्या 8 नोव्हेंबरला उदय लळित निवृत्त होणार आहेत. लळित यांचा सरन्यायाधीश म्हणून एकूण 74 दिवसांचा कार्यकाळ आहे. त्यामुळे नव्या सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस उदय लळीत यांनी करण्याबाबत केंद्र सरकारने पत्र लिहिले आहे.

सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांचा कार्यकाळ 26 ऑगस्ट 2022 रोजी पूर्ण झाल्यावर न्यायमूर्ती लळित यांची 27 ऑगस्ट रोजी देशाचे 49वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पण आता ते साधारणपणे महिन्याभराने निवृत्त होणार असल्याने नवीन सरन्यायाधीशांची नियुक्ती प्रक्रिया सुरू करण्यासाठी केंद्राने उदय लळित यांना पत्र लिहिले आहे.

- Advertisement -

चंद्रचूड होणार नवीन सरन्यायाधीश?
सरन्यायाधीश पदासाठी सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायाधीशाची निवड केली जाते. सध्या न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड हे सर्वात ज्येष्ठ आहेत, त्यामुळे ते सरन्यायाधीश होऊ शकतात. विद्यमान सरन्यायाधीश हे सर्वात वरिष्ठ न्यायाधीशाच्या नावाची आपला उत्तराधिकारी म्हणून शिफारस करतो, अशी परंपरा आहे. विद्यमान नियमानुसार, न्यायमूर्ती चंद्रचूड हे देशाचे 50वे सरन्यायाधीश असतील. त्यांचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर 2022 ते 10 नोव्हेंबर 2024 असा दोन वर्षांचा असेल. न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे वडील जस्टीस यशवंत विष्णू चंद्रचूड हे 1978 ते 1985 या कालावधित ते भारताचे 16वे सरन्यायाधीश होते.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -