घरताज्या घडामोडीदेशात कोरोनाचा हाहाकार! ७ दिवसांत १० लाखांहून अधिक बाधितांची रेकॉर्ड ब्रेक नोंद

देशात कोरोनाचा हाहाकार! ७ दिवसांत १० लाखांहून अधिक बाधितांची रेकॉर्ड ब्रेक नोंद

Subscribe

गेल्या वर्षभरापूर्वी थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसच्या लाटेपेक्षा या दुसऱ्या लाटेत कोरोना संसर्गाची भिती अधिक गडद असल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस बाधितांची समोर येणारी संख्या धडकी भरवणारी असून दररोज येणाऱ्या आकडेवारीतून ते स्पष्ट होत आहे. देशात नव्या बाधितांचा वाढता आकडा पाहता कोरोना रुग्ण वाढीने सर्वच रेकॉर्ड ब्रेक केल्याचे गेल्या काही दिवसात पाहायला मिळत आहे.

देशात आतापर्यंत एक लाख ७२ हजारांहून अधिकांचा जीव कोरोनामुळे गेला आहे तर १ कोटी ३८ लाखांहून अधिक कोरोना बाधित झाल्याचे समोर आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सद्यस्थिती अतिशय भयावह आहे. देशात २४ तासांत १ लाख ८४ हजार ३७२ कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर १ हजार २७ जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत ८२ हजार ३३९ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ते घरी परतले आहेत. तर सध्या १३ लाख ६५ हजार ७०४ रुग्ण उपचार घेत आहेत.

- Advertisement -

दरम्यान देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला असून मागील ७ दिवसात १० लाखांहून अधिक कोरोना बाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी १० दिवसात १० लाख कोरोना बाधितांची नोंद करण्यात येत होती. मात्र वाढणाऱ्या नव्या बाधित रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनापुढं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. यासोबतच कोरोनामुळे बळी जाणाऱ्यांचा आकडा देखील तितक्याच झपाट्याने वाढताना दिसतोय. गेल्या ७ दिवसात ५ हजार ९०८ कोरोना बाधितांनी आपला जीव कोरोनामुळे गमावला असून या सात दिवसात ५ हजार ९०० हून अधिकांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

गेल्या ७ दिवसांतील कोरोनाची स्थिती

  • १३ एप्रिल- १,८४,३७२ बाधितांची नोंद, १०२७ मृत्यू
  • १२ एप्रिल- १,६१,७३६ बाधितांची नोंद, ८७९ मृत्यू
  • ११ एप्रिल- १,६८,९१२ बाधितांची नोंद ९०४ मृत्यू
  • १० एप्रिल- १,५२,८७९ बाधितांची नोंद ८३९ मृत्यू
  • ०९ एप्रिल- १,४५,३८४ बाधितांची नोंद ७९४ मृत्यू
  • ०८ एप्रिल- १,३१,९६८ बाधितांची नोंद ७८० मृत्यू
  • ०७ एप्रिल- १,२६,७८९ बाधितांची नोंद ६८५ मृत्यू

 

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -