घरदेश-विदेशIT मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 2 लाखांहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

IT मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 2 लाखांहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

Subscribe

तुम्हीही नुकतेच इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केला असाल आणि आयटी इंडस्ट्रीत नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण देशातील अनेक बड्या आयटी कंपन्या फ्रेशर्ससाठी बंप्पर भरती सुरु करत आहेत. डिजीटल प्रोजेक्ट्समध्ये होणारी वाढ आणि मिड तसेच सीनियर लेव्हलच्या कर्मचाऱ्यांची वाढती मागणी पाहता आयटी कंपन्या इंजिनीअरिंग शिक्षण पूर्ण केलेल्यांसाठी रेकॉर्ड ब्रेक नोकरीच्य संधी आणत आहेत. बऱ्यात आयटी कंपन्या विशेष कौशल्य असलेल्या लोकांकडून प्रीमियम पेमेंट आणि फ्रेशर्सकडून सरासरी पगारासह या जॉब ऑफर देत आहेत. यासाठी कंपन्यांकडून कॅम्पस प्लेसमेंट देखील आयोजित केले जात आहेत.

‘या’ कंपन्यांमध्ये 2.3 लाख फ्रेशर्सची भरती

टीसीएस (TCS), इंफोसिस (Infosys), विप्रो (Wipro), कॉग्निजेंट (Cognizant), एचसीएल टेक (HCL Tech), टेक महिंद्रा (Tech Mahindra), एसेंचर (Accenture) आणि कॅपजेमिनी (Capgemini) ने आर्थिक वर्ष 2022 मध्ये आतापर्यंत 2.3 लाख नव्या ग्रॅज्युएट्स तरुणांना भरती केले आहे, जो एक विक्रमी आकडा आहे. इंडस्ट्रीच्या अंदाजानुसार, या कंपन्या आर्थिक वर्ष 2023 मध्येही आपल्या फ्रेशर हायरिंग प्रोग्राम सुरू ठेवणार आहे.

- Advertisement -

मार्केट इंटेलिजन्स फर्म अनअर्थइनसाइट (UnearthInsight) ने अलीकडेच एका रिपोर्टमध्ये अंदाज लावला आहे की, आर्थिक वर्ष 2022 च्या अखेरीस टॉपच्या IT कंपन्यांमध्ये फ्रेशर्स नोकरदारांची संख्या 3.5 टक्क्यांवरून 3.6 लाखांपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे या कंपन्यांमधील फ्रेशर टॅलेंटचे प्रमाण 14 वरून 18 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. अनर्थइनसाइटचे संस्थापक आणि सीईओ गौरव वासू म्हणाले की, “कोरोना महामारी असूनही आयटी इंडस्ट्रीने विकास कायम ठेवला आहे. या आर्थिक वर्षात इंडस्ट्री सर्वोत्तम महसूल वाढ साध्य करू शकतो. तसेच इंडस्ट्री अपेक्षेप्रमाणे भरती करणे सुरू ठेवेल.

टॅलेंट सोर्सिंग फर्म डायमंडपिकचे व्यवस्थापकीय पार्टन श्रीराम राजगोपाल म्हणाले की, “इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्सने चांगला अभ्यास केल्यास त्यांना एकापेक्षा जास्त जॉब ऑफर मिळू शकतात. याचवेळी टेक महिंद्राचे चीफ पीपुल ऑफिसर हर्षवेंद्र यांनी या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले की, त्यांनी गेल्या काही तिमाहीत टियर-2 सेंटर्समधून 8,000 हून अधिक लोकांची भरती केली आहे.


12 वर्षांवरील मुलांच्या लसीकरणासाठी Corbevax Vaccine ला DCGI ची मंजुरी


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -