घरदेश-विदेशRed Alert in Punjab : सुखा दुनाकेच्या हत्येनंतर पंजाबमध्ये रेड अलर्ट; 'हे'...

Red Alert in Punjab : सुखा दुनाकेच्या हत्येनंतर पंजाबमध्ये रेड अलर्ट; ‘हे’ आहे कारण?

Subscribe

Red Alert in Punjab : खलिस्तानी दहशतवादी सुखदुल सिंग उर्फ ​​सखू दुनाके (Sukha Duneke) याची कॅनडातील विनिपेगमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दोन गटांत झालेल्या भांडणांमुळे त्याची हत्या करण्यात आली असल्याचं सांगितलं समोर आले आहे. अज्ञात हल्लेखोरांनी सुमारे 20 गोळ्या झाडल्या आणि सुखाचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आता पंजाब पोलिसांनी राज्यात रेड अलर्ट (Red Alert In Punjab) जारी केला आहे. (Red Alert in Punjab after Sukha Dunakes murder)

पंजाबचा कुख्यात गुंड सुखदुल सिंग उर्फ ​​सुखा दुनाके यांची हत्या झाल्यानंतर राज्यात टोळीयुद्ध होऊ नये यासाठी पंजाब पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष चौक्या उभारण्यात आल्या असून संशयास्पद ठिकाणे आणि लोकांवर पोलिसांकडून सतर्कता वाढवण्यात आला आहे. याशिवाय पंजाब पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा – Sukkha Dunake Murder : लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारली हत्येची जबाबदारी; फेसबुक पोस्टमध्ये दिली धमकी

रेड अलर्ट करण्याचे ‘हे’ आहे कारण?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची 26 सप्टेंबर रोजी पंजाबच्या अमृतसरमध्ये बैठक होणार आहे आणि उद्या मोहालीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना होणार आहे. दोन्ही संघांचे  खेळाडू मोहालीला पोहोचले आहेत. त्यामुळे पंजाबचे विशेष डीजीपी अर्पित शुक्ला यांनी स्वत: मोहालीला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तेथील अधिकाऱ्यांशी त्यांनी बैठक घेतल्या असून मोहाली स्टेडियममध्येही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

- Advertisement -

पंजाब पोलिसांनी गोल्डी ब्रारच्या 12 साथीदारांना 

भारत आणि कॅनडामध्ये तणाव वाढ्लयानंतर पंजाब पोलिसांनी गोल्डी ब्रार टोळीविरोधात फिरोजपूरमध्ये 44 ठिकाणी छापे टाकले. गोल्डी ब्रार याच्या 12 साथीदारांना पोलिसांनी शस्त्रांसह अटक केली आहे. एसएसपी दीपक हिलौरी यांनी सांगितले की, गोल्डी ब्रारचे गुंड फिरोजपूरमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांची अनेक पथके तयार करण्यात आली. यामध्ये एसपी, डीएसपी आणि एसएचओ दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता.

हेही वाचा – Parliament Special Session : मी खुलेपणाने चर्चा करण्यास तयार; चीनबाबत संरक्षणमंत्र्यांचे काँग्रेसला प्रत्युत्तर

सखू दुनाके कोण होता?

खलिस्तानी दहशतवादी सुखदुल सिंग उर्फ ​​सखू दुनाके याच्यावर पंजाब आणि आजूबाजूच्या राज्यांमध्ये सुमारे 20 गुन्हेगारी खटल्याची नोंद आहे. यातील काही खटले सुरू असून काही तपासाधीन आहेत. सखू दुनाके हा पंजाबमधील मोगा येथील रहिवासी होता. त्याच्या वडिलोपार्जित घरात त्याचे मामा राहतात तर त्याची आई आणि बहीण कॅनडामध्ये राहतात. सुखा दुनाके 2017 मध्ये बनावट पासपोर्ट वापरून कॅनडाला पळून गेला होता. राष्ट्रीय तपास संस्थेने नुकत्याच जाहीर केलेल्या 41 दहशतवादी आणि गुंडांच्या यादीत त्याचा समावेश होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -