घरCORONA UPDATECovishield लसीच्या २ डोसमधील अंतर कमी होण्याची शक्यता

Covishield लसीच्या २ डोसमधील अंतर कमी होण्याची शक्यता

Subscribe

कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवून १६ आठवडे करण्यात आले होते. आरोग्य तज्ञांच्या मते, त्यावेळी देशात लसींचे प्रमाण कमी होते.

देशात आपत्कालीन वापरात असलेल्या कोव्हिशिल्ड (Covishield)  लसीला भारतात सर्वाधिक मागणी आहे. मात्र या लसीच्या दोन डोसमध्ये तब्बल ८४ दिवसांचे अंतर आहे. केंद्र सरकार कोरोना विरोधी लसीच्या २ डोस मधील अंतर कमी करण्याचा विचार करत आहे. इंडियन असोसिएशन ऑफ प्रिवेंटिव अँड सोशल मेडिसीनने (IPSM) सरकारकडे कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्यासाठी शिफारस केली आहे. (reduce the gap between 2 doses of Covishield vaccine)  यावर केंद्र सरकार विचार करत असल्याचे IPSM ने सांगितले आहे.

- Advertisement -

कोरोना विरोधी कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसमध्ये ८४ दिवसांचे अंतर आहे. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर ८४ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागतो. हे अंतर कमी केल्यास लसीचे दोन डोस लवकरात लवकर देता येतील आणि कोरोना संक्रमणाचा धोका देखील कमी होईल. कोव्हिशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना कोरोना संक्रमणाचा धोका कमी आहे. त्याचप्रमाणे देशात डेल्टा व्हेरिएंटचा धोका देखील वाढला आहे. त्यामुळे लसींच्या दोन डोसमधील अंतर कमी केल्यास लवकरात लवकर लसीचे दोन डोस पूर्ण करुन लसीकरण करणे आणखी सोपे होईल.

- Advertisement -

कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवून १६ आठवडे करण्यात आले होते. आरोग्य तज्ञांच्या मते, त्यावेळी देशात लसींचे प्रमाण कमी होते. तेव्हा केवळ २ लसी वापरात होत्या. आता देशाकडे कोरोनाशी लढण्यासाठी ६ लसी उपलब्ध आहेत. जर लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी झाले तर लसीकरणाला वेग येईल आणि लोकांचा कोरोनापासून बचाव करण्यात येईल.

देशात आतापर्यंत ५८.८२ करोड लोकांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे. देशातील १.६० करोड लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. यात ज्येष्ठ नागरिकांचा मोठी संख्या आहे.


हेही वाचा – Covishield लसीच्या दोन डोसमध्ये ८४ दिवसांचे अंतर का? केरळ हायकोर्टाची केंद्राला विचारणा

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -