देशभरात कोरोना बाधितांच्या संख्येत घट; राज्यात 611 नव्या रुग्णांची नोंद

24 तासांत देशात 4,912 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर त्याच्या एक दिवसआधी देशात 5,383 कोरोना रूग्ण आढळले होते. मात्र आजच्या तुलनेत 441 रूग्ण घटले आहेत.

सध्या देशभरात कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. नुकत्याच आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, सध्या संपूर्ण देशभरामध्ये एकूण 44,436 रूग्ण सक्रिय आहेत. देशातील सक्रिय रूग्णांची संख्या कमी झाली असून गेल्या 24 तासांत देशात 4,912 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर त्याच्या एक दिवसआधी देशात 5,383 कोरोना रूग्ण आढळले होते. मात्र आजच्या तुलनेत 441 रूग्ण घटले आहेत.

देशातील एकूण सक्रिय रूग्ण
देशामध्ये सध्या 44 हजारांपेक्षा अधिक रूग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. मात्र यांपैकी अनेक रूग्ण लवकर बरे देखील होत आहेत. तसेच मागील 24 तासांत 5,719 रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. शिवाय गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे 38 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यभरात शुक्रवारी 611 नव्या रूग्णांची नोंद झाली तसेच दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच शुक्रवारी राज्यातील 687 रूग्ण बरे झाले आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये आत्तापर्यंत एकूण 79,66,82 कोरोनाबाधित रूग्ण बरे झाले आहेत.

मुंबईत नव्या रूग्णांची नोंद
देशासह राज्यभरामध्ये देखील कोरोना रूग्णांची संख्या कमी होताना दिसत आहेत. मुंबईमध्ये शुक्रवारी 106 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अहवालानुसार, मुंबईमध्ये आत्तापर्यंत 11,29,071 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.


हेही वाचा :

अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये पुन्हा मोठा बॉम्बस्फोट; 4 जणांचा मृत्यू, 10 जखमी