घरदेश-विदेशपंतप्रधानांचं घर भाड्याने देणे आहे!

पंतप्रधानांचं घर भाड्याने देणे आहे!

Subscribe

आर्थिक संकटाचा सामना करणारा पाकिस्तानने पंतप्रधानांचे निवासस्थान भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांचे अधिकृत निवासस्थान आता सर्वसामान्य लोकांना भाड्याने घेता येणार आहे. इम्रान खान यांचं इस्लामाबादच्या रेड झोनमध्ये असणारं अधिकृत निवासस्थान भाड्याने देण्यात येणार आहे. पाकिस्तानच्या फेडरल कॅबिनेटकडून यासंबंधी अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात असल्याचे पाहायला मिळत आहे. याच आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान कॅबिनेटने पंतप्रधानांचं हे अधिकृत निवासस्थान सांस्कृतिक, शैक्षणिक, फॅशन तसंच इतर कार्यक्रमांसाठी भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

यापूर्वी ऑगस्ट २०१९ मध्ये जेव्हा सत्ताधारी पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) सरकार स्थापन झाले, तेव्हा पंतप्रधान इम्रान खान यांनी सरकारी निवासस्थानाला शैक्षणिक संस्थेत रुपांतरित करण्याची घोषणा केली होती. यानंतर इम्रान खान यांनी ते घर रिकामे केले होते. पंतप्रधानांच्या निवासस्थानी शिस्त पाळली जावी तसेच नियमांचं उल्लंघन होऊ नये यासाठी दोन समिती स्थापन करण्यात आल्याचे एका वृत्त वाहिनीने दिले आहे.२०१९ मध्येच इम्रान खान यांनी पाकिस्तान पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान, त्यांनी देशातील लोककल्याणकारी योजनांवर खर्च करण्यासाठी पैसा नसल्याचे सांगितले होते. तेव्हापासून इम्रान खान त्यांच्या ‘बानी गाला’ निवासस्थानी राहत असून फक्त पंतप्रधान कार्यालयाचा वापर करतात.

दरम्यान, स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, पंतप्रधान इम्रान खान लवकरच याप्रकरणी मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीमध्ये सरकारी निवासस्थानातून मिळणाऱ्या महसूलवर चर्चा केली जाणार आहे. पंतप्रधान निवासस्थानाचे सभागृह, दोन अतिथी विंग आणि लॉन भाड्याने देऊन महसूल गोळा केला जाईल. या कॅम्पसमध्ये राजनैतिक कार्ये, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे देखील आयोजित केली जाणार आहेत.


गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेल्या बिझनेसमन गौतम थापरला ED कडून अटक
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -