घरदेश-विदेशपेशावरमधील बॉम्बस्फोटाबद्दल पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी दिला भारताचा दाखला, म्हणाले...

पेशावरमधील बॉम्बस्फोटाबद्दल पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी दिला भारताचा दाखला, म्हणाले…

Subscribe

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या पेशावर (Peshawar) येथे 30 जानेवारी 2023 रोजी मशिदीमध्ये नमाज पठणादरम्यान आत्मघातकी हल्ला झाला होता. त्यात सुमारे 100 जणांचा मृत्यू, तर 200हून अधिक जखमी झाले. या आत्मघाती हल्ल्याचा भारतासह जगभरातून निषेध करण्यात आला. पाकिस्तानच्या नॅशनल असेम्बलीमध्ये (Pakistan National Assembly) या घटनेवर चर्चा झाली. त्यात संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ (Defence Minister Khawaja Asif) यांनी भारत आणि इस्रायलचा हवाला देत, आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असल्याचे सांगितले.

पेशावरच्या मशिदीत झालेल्या हल्ल्यात प्रामुख्याने पोलिसांना लक्ष करण्यात आल्याचे सांगितले जाते. आत्मघाती हल्लेखोर 10-12 किलो स्फोटके घेऊन मशिदीत आला होता. दुपारच्या नमाजासाठी 300 ते 400 पोलीस मशिदीत जमले होते. त्याचवेळी आत्मघाती हल्ला करण्यात आला, ज्यामुळे एक भिंत आणि छत कोसळले आणि अनेक पोलीस ढिगाऱ्याखाली गाडले गेले, अशी माहिती पेशावरचे पोलीस प्रमुख मोहम्मद एजाज खान यांनी या घटनेनंतर दिली. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (TTP) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

- Advertisement -

पाकिस्तानच्या नॅशनल असेम्बलीमध्ये मंगळवारी यावर चर्चा झाली. तेथील संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी पेशावरमधील आत्मघाती बॉम्बस्फोटाबाबत सांगितले की, भारत आणि इस्रायल हे खरे पाकिस्तानसाठी शत्रूराष्ट्रे आहेत. पण भारतात किंवा इस्रायलमध्ये नमाज पढताना नागरिक मारले गेले नाहीत, परंतु हे पाकिस्तानमध्ये घडले. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आता सर्वांनी एक होण्याची गरज आहे, असे आवाहन करत ख्वाजा आसिफ म्हणाले की, पाकिस्तानने आता आत्मपरीक्षण करून आपले घर व्यवस्थित ठेवण्याची वेळ आली आहे.

- Advertisement -

सन 2010-2017 या काळातील दहशतवादाच्या घटनांचा उल्लेख करून मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले, हे युद्ध पीपीपीच्या कार्यकाळात स्वातपासून सुरू झाले आणि ते पीएमएल-एनच्या मागील कार्यकाळात संपले आणि कराचीपासून स्वातपर्यंत देशात शांतता प्रस्थापित झाली होती. दीड-दोन वर्षांपूर्वी या सभागृहात दोन-तीनदा ब्रीफिंग देण्यात आले होते. दहशत पसरवणाऱ्या या लोकांशी चर्चा करून त्यांना शांततेच्या दिशेने आणले जाऊ शकते, असे त्यात स्पष्टपणे म्हटले होते. त्यावेळी या मुद्द्यावर वेगवेगळी मते मांडण्यात आली होती. परंतु तरीही आपण कोणताही ठोस निर्णय घेतला गेला नाही, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -