घर देश-विदेश 'शिवशक्ती' आणि 'तिरंगा' नामकरणाबाबत इस्रोप्रमुख एस. सोमनाथ म्हणतात...

‘शिवशक्ती’ आणि ‘तिरंगा’ नामकरणाबाबत इस्रोप्रमुख एस. सोमनाथ म्हणतात…

Subscribe

नवी दिल्ली : चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या ज्या भागावर चांद्रयान-3 उतरले आहे, त्या टचडाउन पॉइंटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘शिवशक्ती’ असे नाव दिले आहे. तर, ज्या ठिकाणी चांद्रयान-2 क्रॅश झाले होते, त्या ठिकाणाला ‘तिरंगा’ असे नाव देण्यात आले आहे. तथापि, या नामकरणावरून विरोधकांनी नाराजी व्यक्त करत, भाजपाच्या 2024च्या प्रचाराचा हा फंडा असल्याची टीका त्यांनी केली आहे. या राजकीय वादावर आता इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांची प्रतिक्रिया आली आहे.

हेही वाचा – अभी तो सूरज उगा है…, कविता वाचन करत पंतप्रधान मोदींकडून मिशन चांद्रयान-3चे कौतुक

- Advertisement -

भारतीय खगोलशास्त्राच्या दृष्टीने 23 ऑगस्ट 2023 हा ऐतिहासिक दिवस आहे. या दिवशी, चांद्रयान-3चे विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिणेकडे सॉफ्ट लँडिंग केले. या कामगिरीनंतर भारत हा अशी कामगिरी करणारा पहिला देश ठरला आहे. पंतप्रधान मोदी यांनी 23 ऑगस्ट हा भारतीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांनी लँडिंग साईटचे नाव ‘शिवशक्ती पॉइंट’ असे ठेवले. याशिवाय, ज्या ठिकाणी चांद्रयान-2 क्रॅश झाले, त्याचे नामकरण ‘तिरंगा’ असे करण्यात आले.

यावरून देशातील राजकारण तापले आहे. विरोधक पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. 2024मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा हा प्रमुख मुद्दा असल्याचे सांगत विरोधकांनी भाजपावर टीका केली आहे. आपण फक्त चंद्रावर उतरलो आहोत, एखाद्या ठिकाणाचे नामकरण करण्यासाठी आपण चंद्राचे मालक झालेलो नाहीत, असे काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, काँग्रेस पक्षाने आपल्या सरकारच्या काळात चंद्राच्या एका भागाचे नाव जवाहर पॉइंट ठेवल्याचे सांगत, भाजपाने पलटवार केला आहे. 2008मध्ये चंद्रावर ज्या ठिकाणी चांद्रयान-1चे क्रॅश लँडिंग झाले होते, त्या जागेला तत्कालीन काँग्रेस सरकारने जवाहर पॉइंट असे नाव दिले होते.

- Advertisement -

हेही वाचा – भाजपाने नुसता खिसा साफ केला तरी…, संजय राऊत यांचा हल्लाबोल

आरोप-प्रत्यारोपात इस्रो प्रमुख काय म्हणतात?
या आरोप-प्रत्यारोपाच्या गदारोळात इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांचे वक्तव्य समोर आले आहे. पंतप्रधानांनी त्याचा अर्थ आपल्या सर्वांना योग्य वाटेल अशा पद्धतीने सांगितला आहे. तसेच त्यांनी त्याचा अर्थही स्पष्ट केला आहे. त्यात काही गैर नाही, असे मला वाटते. तिरंगा आणि शिवशक्ती ही दोन्ही नावे भारतीय आहेत. आपण जे करत आहोत त्याला महत्त्व असायला हवे आणि देशाचे पंतप्रधान म्हणून नाव देणे हा त्याचा विशेषाधिकार आहे, असे त्यांनी सांगितले.

मंगळ आणि शुक्रावर जाण्याचीही क्षमता
चंद्रानंतर मंगळ आणि शुक्रावर जाण्याची इस्रोची क्षमता आहे. पण आपला आत्मविश्वास वाढवायला हवा. आम्हाला अधिक गुंतवणुकीची देखील गरज आहे. म्हणूनच देशाच्या अंतराळ संशोधन क्षेत्राचा विकास व्हायला हवा, हेच आमचे ध्येय आहे, असे एस सोमनाथ यांनी शनिवारी तिरुअनंतपुरममधील एका कार्यक्रमात सांगितले.

- Advertisment -