Thursday, February 18, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Petrol Diesel Price: पहिल्यांच 'या' राज्यात पेट्रोल दराने गाठली शंभरी!

Petrol Diesel Price: पहिल्यांच ‘या’ राज्यात पेट्रोल दराने गाठली शंभरी!

Related Story

- Advertisement -

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असून सर्वसामान्यांना याचा फटका बसत आहे. आजही देशातल्या अनेक राज्यांध्ये पेट्रोलने शंभरी पार केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. बेंचमार्क क्रूड ऑईल ६३ डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेलं आहे. आजही राज्यासह अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. तर राजस्थानमध्ये पेट्रोलच्या किंमतीने शंभरी ओलांडली आहे. देशातील सर्वात जास्त वॅट असलेल्या राजस्थानमध्ये दिवसागणिक वाढ होताना दिसत असून आज श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलच्या दराने प्रति लिटर शंभरी पार केली आहे.

राजस्थानचे श्रीगंगानगर हे असे शहर बनले आहे, ज्याठिकाणी पहिल्यांदाच पेट्रोलच्या किंमतीने प्रतिलिटर १०० रुपये पार केले आहे. बुधवारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २५ पैशांची वाढ केली. बुधवारी राजस्थानमधील श्री गंगानगरमध्ये पेट्रोल प्रति रूपये लीटरची किंमत ही १००. १३ रूपये होती. तर देशातील कोठेही ऑटोमोटिव्ह इंधन प्रथमच १०० रुपयांच्या आकड्यावर गेले. अन्य राज्यांत कच्च्या तेल्याच्या किंमतींच्या वाढत्या परिणामामुळे केंद्रीय आणि मध्य राज्यात उच्च व मध्यवर्ती करांच्या किंमती ९० लिटरच्यावर जाण्याची अपेक्षा आहे.

- Advertisement -

आज सलग दहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ही वाढ झाली आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये तर पेट्रोलची किंमत प्रतिलिटर १०० रुपयांच्या पुढे गेल्याने मुंबईसह दिल्लीत पेट्रोलचे भाव वाढतील का चिंतेत नागरिक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत ३४ पैसे वाढीसह ८९.८८ वर पोहोचलं तर मुंबईतील पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ९६.३२ रुपयांवर पोहोचली आहे.

देशातील प्रमुख पाच शहरातील दर

  • मुंबई – पेट्रोल ९६.३२ रुपये, डिझेल ८७.३२ रुपये
  • दिल्ली – पेट्रोल ८९.८८ रुपये, डिझेल ८०.२७ रुपये
  • चेन्नई – पेट्रोल ९१.९८ रुपये, डिझेल ८५.३१ रुपये
  • कोलकाता – पेट्रोल ९१.११ रुपये, डिझेल ८३.८६ रुपये
- Advertisement -