घरदेश-विदेशसँताक्लॉजची गाडी धोक्यात, कमी होतेय रेनडिअरची संख्या

सँताक्लॉजची गाडी धोक्यात, कमी होतेय रेनडिअरची संख्या

Subscribe

सध्या वाढणारे ग्लोबल वॉर्मिंग पाहता याचा परीणामही प्राण्यांवर होत आहे. थंड प्रदेशात राहणारा हा प्राणी आहे. पण ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणारा वातावरणातील बदल रेनडिअरच्या प्रकृतीत बिघाड करत आहे.

‘जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल द बेल’, असे म्हणत रेनडिअरच्या गाडीत बसून बर्फातून येणाऱ्या सँताक्लॉज सगळ्यांना माहीत आहे. पण आता सँताची हीच गाडी धोक्यात आली आहे. कारण सँताला घेऊन येणारा रेनडिअर नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अमेरिकेतील नॅशनल ओशनिक अॅण्ड एटमॉस्फेरिक एडमिनिस्ट्रेशनने तयार केलेल्या अहवालानुसार जलवायू परिवर्तन आणि प्रदूषण याचा परिणाम रेनडिअरच्या संख्येवर होत असून १९९५ सालापासून आतापर्यंत २६ लाख रेनडिअरची हत्या झाली आहे.

वाचा- ख्रिसमस स्पेशल | असा बनवा ‘Apple pie’

मांस चांगले

रेनडिअरची संख्या कमी होण्यात शिकार हे महत्वाचे कारण आहे. इतर जनावरांच्या तुलनेत रेनडिअरच्या मासांमध्ये कमी चर्बी असते आणि हे मांस शरीरासाठी चांगले असते.त्यामुळे रेनडिअरची शिकार केली जाते.

- Advertisement -
वाचा- यंदाचा ख्रिसमस सण महागला

प्रदुषणाचा परीणाम

सध्या वाढणारे ग्लोबल वॉर्मिंग पाहता याचा परीणामही प्राण्यांवर होत आहे. थंड प्रदेशात राहणारा हा प्राणी आहे. पण ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणारा वातावरणातील बदल रेनडिअरच्या प्रकृतीत बिघाड करत आहे.

जेवणाची कमी

आर्क्टिकमध्ये वाढणारे तापमान यासाठी कारणीभूत आहे. या ठिकाणी पडणारा पाऊस त्यानंतर साचणारा बर्फ यामुळे रेनडिअर आपला आहार शोधू शकत नाही. पर्यायी ते उपाशी राहतात. त्यामुळे ते त्यांच्या पिल्लांनाही जेवण शोधून देऊ शकत नाही. पर्यायी त्यांची पिल्ले देखील त्यामुळे कुपोषशित आणि नाजूक होत आहेत. त्यामुळे त्यांची पिल्ले या वातावरणात तग धरु शकत नाही. रेनडिअरची शारिरीक रचना बर्फात राहू शकणार अशी आहे. थंड हवा, गरम करण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते. त्याचे नाक गुलाबी रंगाचे असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -