Homeक्राइमRekha Kadiresh murder : सात जणांना जन्मठेप, 49पैकी 48 साक्षीदारांनी जबाब फिरवला

Rekha Kadiresh murder : सात जणांना जन्मठेप, 49पैकी 48 साक्षीदारांनी जबाब फिरवला

Subscribe

एक आरोपी आणि रेखा कादिरेश यांची मेहुणी माला आर (60) हिचा सुनावणीदरम्यान आजाराने मृत्यू झाला होता. या खटल्यात एकूण 49 साक्षीदार होते. यापैकी 48 जणांनी आपले जबाब फिरवले.

(Rekha Kadiresh murder) बंगळुरू : भाजपाच्या माजी नगरसेविक रेखा कादिरेश यांच्या हत्येप्रकरणी सात जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणात एकूण 49 साक्षीदार होते. परंतु यापैकी 48 जणांनी सुनावणीदरम्यान आपले जबाब फिरवले. मात्र, एका साक्षीदाराने दिलेल्या पुराव्याच्या आधारे स्थानिक न्यायालयाने दोषसिद्ध सातजणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. (Bangalore court sentenced seven people to life imprisonment)

मोफत भोजनवाटप कार्यक्रम आटोपल्यानंतर 24 जून 2021 रोजी मध्य बंगळुरूमधील चालवदिपाल्या येथील आपल्या घरी जात असताना हत्यारे घेऊन आलेल्या एका जमावाने रेखा कादिरेश (45) यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. कौटुंबिक कलह आणि राजकीय वैमनस्य हे या कटामागे असल्याचे सांगण्यात येत होते. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली होती. तत्कालीन डीसीपी संजीव पाटील यांच्या नेतृत्वाखालील एका विशेष पथकाने हत्येनंतर 24 तासांत आरोपींना पकडले होते. अटक झाल्यापासून सर्व आरोपी बंगळुरू मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.

हेही वाचा – Kumar Vishwas about Kareena Kapoor : कुमार विश्वास यांच्या निशाण्यावर करिना कपूर, म्हणाले…

यातील एक आरोपी आणि रेखा कादिरेश यांची मेहुणी माला आर (60) हिचा सुनावणीदरम्यान आजाराने मृत्यू झाला होता. या खटल्यात एकूण 49 साक्षीदार होते. यापैकी 48 जणांनी आपले जबाब फिरवले. न्यायालयात हजर राहण्याचेही ते टाळत होते. मात्र, आणखी एक साक्षीदार असलेल्या मुलीने मोबाइल फोनवर रेकॉर्ड केलेला व्हिडिओ या खटल्यात पुरावा बनला. या व्हिडिओमध्ये रेखा कादिरेश यांच्यावर झालेला हल्ला स्पष्टपणे दिसत होता.

या व्हिडीओच्या आधारे सात जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यात माला आर. हिचा मुलगा आर. अरुण कुमार (39), पीटर अँथनी (49), व्ही सुरेश ऊर्फ ​​सूर्या (23), जे. स्टिफन (24), एस. पुरुषोत्तम (26), अजय के. (24) आणि व्ही. सेल्वराज ऊर्फ ​​बुडान ऊर्फ ​​कॅप्टन (39) यांचा त्यात समावेश आहे.

हत्येचे कारण काय?

रेखा कादिरेश या माला आर हिचा भाऊ कादिरेशच्या पत्नी होत्या. माला हिला रेखा कादिरेश हिचा मत्सर वाटत होता. रेखा कादिरेश यांच्या राजकीय प्रगतीने ती अस्वस्थ होती आणि तिला रोखण्यासाठी तिने हे पाऊल उचलले. तसेच, कादिरेश यांची 2018मध्ये हत्या झाली होती आणि त्यामागे रेखा कादिरेश यांचा हात असल्याचा संशय मालाला होता, असे न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान समोर आले. (Rekha Kadiresh murder: Bangalore court sentenced seven people to life imprisonment)

हेही वाचा – SS UBT Vs Mahayuti : वेगाच्या आणि कामाच्या बाबतीत सगळीच बोंब, ठाकरे गटाचा राज्य सरकारवर हल्लाबोल