घरदेश-विदेशअतिक अहमदच्या एन्काऊंटरची नातेवाईकांना भीती, पोलिसांच्या ताफ्यासोबत चालत होती गँगस्टरची बहीण

अतिक अहमदच्या एन्काऊंटरची नातेवाईकांना भीती, पोलिसांच्या ताफ्यासोबत चालत होती गँगस्टरची बहीण

Subscribe

नवी दिल्ली : माफिया अतिक अहमदला (atiq ahmed) गुजरातच्या तुरुंगातून उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कडक सुरक्षा व्यवस्थेत नेण्यात येत आहे. अतिकच्या ताफ्यासोबत मोठ्या संख्येने यूपी पोलीस कर्मचारी आणि मीडिया कर्मचारी आहेत. याशिवाय अतिकची बहिणसुद्धा पोलिसांच्या ताफ्यासोबत असून तिने मोठे वक्तव्य केले आहे.

माफिया अतिक अहमदला गुजरातच्या साबरमती तुरुंगातून प्रयागराजच्या खासदार/आमदार विशेष न्यायालयात हजर करण्यात उद्या (२८ मार्च) हजर करण्यात येणार आहे. पोलिसांच्या कडक सुरक्षा व्यवस्थेत हा ताफा राजस्थान आणि मध्य प्रदेशमार्गे यूपीमध्ये दाखल झाला आहे. बसपाचे माजी आमदार राजू पाल यांच्या हत्येतील मुख्य आरोपी असलेला अतिक उमेश पाल खून प्रकरणाचाही मास्टरमाईंड आहे. यासोबतच तो 2006 मध्ये उमेश पालच्या अपहरणाचाही आरोपी आहे. अपहरणाच्या या प्रकरणात न्यायालयाचा उद्या निकाल येणार असल्यामुळे अतिकला नेण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – गोध्रा कांड : बिल्किस बानोच्या गुन्हेगारांच्या खटल्यावर आज सुर्वोच्च न्यायालयात सुनावणी

अतिकची बहीण आणि वकीलांना ‘ही’ भीती
गुजरातहून निघालेल्या पोलिसांच्या ताफ्यासोबत अतिकची बहिणसुद्धा चालत आहे. तिने यावेळी वक्तव्य केले की, जो निर्णय येईल तो आम्हाला मान्य आहे. परंतु आम्हाला सुरक्षा व्यवस्थेची भीती वाटते, त्यामुळे आम्ही ताफ्यासोबत चालत आहोत. आम्ही त्यांचा पाठलाग करत नाही. आमच्या कुटुंबातील सगळे तुरुंगात आहेत. अतिकच्या वकिलांनी सांगितले की, आतापर्यंत अतिकला सुरक्षितपणे नेले जात आहे. तुरुंगातून बाहेर पडताना अतिकने आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते.

- Advertisement -

अतिकच्या भावाला घेण्यासाठी पोलीस कारागृहात
प्रयागराज पोलीस अतिकसोबत झाशीच्या दिशेने रवाना झाले आहेत, तर अतिक अहमदचा भाऊ अशरफ याला बरेली जिल्हा कारागृहात नेण्यासाठी पोलिसांची एक टीम पोहोचली आहे. अतिक आज दुपारी ३-४ वाजता प्रयागराजला पोहोचेल असे समजते. यादरम्यान त्यांचा ताफा चार राज्यांमधून (गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश) जात आहे. हा प्रवास एकूण 1300 किलोमीटरचा आहे. अतिकच्या ताफ्यात 45 पोलीस कर्मचारी आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -