घरताज्या घडामोडीReliance AGM 2021: गुडन्यूज! पुढील ३ वर्षात १० लाखांहून जास्त नोकऱ्या देण्याचा...

Reliance AGM 2021: गुडन्यूज! पुढील ३ वर्षात १० लाखांहून जास्त नोकऱ्या देण्याचा अंबानींचा दावा

Subscribe

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४४व्या वार्षिक महासभेमध्ये (Reliance AGM) आज, गुरुवारी कंपनीचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी नव्या स्मार्टफोनसह अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. ते म्हणाले की, रिलायन्स इंडस्ट्रीजचा आतापर्यंत प्रवास जबरदस्त राहिला आणि रियालन्स रिटेल सेक्टरमध्ये वेगाने वाढ होत आहे. दरम्यान पुढील ३ वर्षात १० लाखांहून जास्त नोकऱ्या देण्याचा दावा यावेळी मुकेश अंबानी यांनी केला आहे.

मुकेश अंबानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ पैकी १ भारतीय रिलायन्स रिटेलमधून शॉपिंग करत आहेत. रिलायन्स रिटेलचा सर्वात वेगवान व्यवसाय सुरू आहे. गेल्यावर्षी १५०० नवे स्टोअर खुले केले. Apparel Bizमध्ये १ वर्षात १८ कोटी युनिक विक्री झाले आहेत. ग्राहकांची इलेक्ट्रोनिक्समध्ये स्थिती मजबूत झाली आहे.

- Advertisement -

पुढे अंबानी म्हणाले की, रियालन्स रिटेल सेक्टरमध्ये पुढील ३ वर्षात जवळपास १० लाख लोकांना नोकऱ्या देईल. शिवाय ते असे म्हणाले की, गेल्या एका वर्षात रिलायन्स रिटेलने ६५ हजार नवीन नोकऱ्या निर्माण केल्या आहेत आणि याची स्टाफची संख्या वाढून आता २ लाखांहून अधिक झाली आहे.

‘आम्ही संशोधन, डिझाईन आणि उत्पादन क्षमतेमध्ये गुंतवणूक करणार आहे. यासोबतच आम्ही पुरवठा साखळीच्या पायाभूत सुविधांवर देशभरातील स्त्रोत आणि कंजम्पशनच्या ठिकाणांना लिंक करणार आहोत,’ अशी माहिती मुकेश अंबानी यांनी दिली.

- Advertisement -

मुकेश अंबानी यांनी ग्लोबल न्यू एनर्जीवर जोर देऊन कंपनीच्या वार्षिक बैठकी म्हणाले की, ‘२०२१मध्ये New Energy BIZ लाँच करू. न्यू एनर्जी बिझनेसमध्ये रिलायन्स लीडर होईल आणि ४ गीगा फॅक्ट्रीची स्थापना करेल. रिन्यूबल एनर्जीमध्ये ६० हजार कोटींची गुंतवणूक करेल. दरम्यान २०३० पर्यंत रिलायन्स १०० गेगावाट एनर्जी स्थापित करेल. सोरल एनर्जी स्टोरेशनसाठी बॅटरीचे नवीन तंत्रज्ञान आणले जाईल. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेसोबत आहोत.’


हेही वाचा – JioPhone Next: जिओ आणि गुगलच्या भागीदारीतून स्वस्तात मस्त नवा स्मॉर्ट फोन, सप्टेंबरमध्ये मध्ये होणार लाँच


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -