घरदेश-विदेशरिलायन्सविरोधात अ‍ॅमेझॉनला मिळाला मोठा विजय, SC ने फ्युचर ग्रुपसोबतची डील रोखली

रिलायन्सविरोधात अ‍ॅमेझॉनला मिळाला मोठा विजय, SC ने फ्युचर ग्रुपसोबतची डील रोखली

Subscribe

अमेरिकेतील जगप्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा विजय मिळाला आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने अ‍ॅमेझॉनची ४९ टक्के हिस्सेदारी असलेल्या फ्युचर ग्रुप कंपनीच्या रिलायन्स कंपनीतील विलगीकरणाच्या करारास रोखले आहे. त्यामुळे न्यायलायात अ‍ॅमेझॉनच्या बाजूने निर्णय लागला आहे. न्यायालयाने म्हटले की, सिंगापूरच्या आणीबाणी न्यायाधिकरणाने (ईए) ऑक्टोबरमध्ये इमरजेंसी सुनावणीत हा करार थांबवण्याचा निर्णय भारतावरही लागू होईल असे स्पष्ट केलं होत.

फ्युचर ग्रुप आणि रिलायन्स रिटेल यांच्यात २४ हजार कोटींपेक्षा अधिकचा करार झाला होता. अ‍ॅमेझॉनने या करारावर आक्षेप घेतला आहे. अ‍ॅमेझॉनने फ्युचर ग्रुपच्या कूपनमधील भाग भांडवलीचा हवाला देत या करारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता.

- Advertisement -

यावर अ‍ॅमेझॉनचे काय मत आहे?

अ‍ॅमेझॉनने न्यायालयाला म्हटले की, सिंगापूर आणीबाणी न्यायाधिकरणाचा (ईए) फ्युचर ग्रुपच्या रिलायन्स रिटेलमध्ये विलीनीकरणाचा करार रोखण्याचा निर्णय ‘वैध’ असून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. या प्रकरणात ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी फ्युचर ग्रुप आणि ज्येष्ठ वकील गोपाल सुब्रमण्यम यांनी अ‍ॅमेझॉनच्या बाजूने युक्तिवाद केला.

अ‍ॅमेझॉनने या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात घेतली धाव

रिलायन्स-फ्युचर ग्रुप कराराचा मार्ग मोकळा करुन देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयातील खंडपीठाच्या निर्णयाविरोधात अ‍ॅमेझॉनने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. अ‍ॅमेझॉनने न्यायालयात असा युक्तिवाद केला की, फ्युचर गुपच्या बियाणी कुटुंबाने यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली होती. त्यामुळे फ्युचर ग्रुपला रिलायन्स रिटेलमध्ये विलीनीकरणाच्या प्रक्रियेला रोखण्याचा ईएचा निर्णयाचे पालन करण्यास बांधील आहे.

- Advertisement -

अ‍ॅमेझॉनची नेमकी अडचण काय ?

रिलायन्स आणि फ्युचर ग्रुपच्या कराराच्या मालकी हक्कावर अ‍ॅमेझॉनला आक्षेप आहे. कारण फ्युचर ग्रुपच्या मालकीची फ्युचर कूपन्स या कंपनीत अ‍ॅमेझॉनची ४९ टक्के हिस्सेदारी आहे. अ‍ॅमेझॉन आणि फ्युचर ग्रुप यांच्यातील करारानुसार, जर कंपनी विकली गेली, तर अ‍ॅमेझॉनला खरेदीचा पहिला हक्क असेल, पण रिलायन्स-फ्युचर ग्रुप करारात याचे पालन झाले नाही.

रिलायन्सचे शेअर्स घसरले

न्यायालयाच्या निर्णयानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये २ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण नोंदवण्यात आली आहे. रिलायन्स व्यतिरिक्त फ्युचर ग्रुपच्या रिटेल कंपनीच्या शेअर्समध्येही घसरण दिसून होत असल्याचे पाहायला मिळत आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -