घरताज्या घडामोडीReliance Share price: मुकेश अंबानी तोट्यात; रिलायन्सने एका दिवसात गमावले ७२ हजार...

Reliance Share price: मुकेश अंबानी तोट्यात; रिलायन्सने एका दिवसात गमावले ७२ हजार कोटी; काय आहे शेअरची परिस्थिती?

Subscribe

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) कंपनीच्या शेअरमध्ये सतत घसरण सुरू आहे. मंगळवारी शेअर बाजार उघडल्यापासून रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये घसरण सुरू आहे. बीएसई (BSE) उघडल्याच्या सुरुवातीलाच १.१५ टक्के कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण होऊन २३३६.१५ रुपये ट्रेड करत होते. यापूर्वी सोमवारी यामध्ये ४ टक्क्यांची घसरण झाली होती. यामुळे कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये ७२ हजार कोटी रुपयांची घसरण झाली होती. कंपनीने सौदी अरामकोसोबत १५ अरब डॉलरच्या प्रस्तावित डील रद्द केली. याचा परिणाम गुंतवणूकदारांच्या भावनेवर झाला आणि रिलायन्सच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

बीएसईवर कंपनीचा शेअर ४.४२ टक्के घसरणीसोबत २,३६३ रुपयांवर पोहोचला होता. या किंमतीवर कंपनीचे मार्केट कॅप १४.९९ लाख रुपये राहिले होते. अॅनालिस्ट्सने कंपनीच्या प्राईस टार्गेटमध्ये कोणताही बदल केला नाही. कंपनीला ऊर्जा आणि नवीन वाणिज्य व्यवसायात प्रवेश करायचा आहे. तज्ज्ञांचे मत आहे की, दुरुस्त बॅलेंस शीट आणि पुढील काही वर्षांमध्ये मिळणाऱ्या कॅशमुळे कोणतीही समस्या झाली नाही पाहिजे.

- Advertisement -

शेअरमध्ये का झाली घसरण?

Credit Suisseने रिलायन्सच्या शेअर न्यूट्रल रेटिंग दिली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, सौदी अरामकोसोबतची डील रिलायन्साठी उत्प्रेरक म्हणून काम करत होता. अरामकोचे चेअरमनला रिलायन्स संचालक मंडळात समाविष्ट करण्यात आले आणि ही डील अंतिम टप्प्यात येईल, असा त्यांच्या विश्वास होता. गुंतवणूकदारांच्या मनात एकच प्रश्न होता की, ही डील पूर्ण कॅशमध्ये होईल की कॅश आणि स्टॉक डीलमध्ये होईल. पण कंपनीने केलेल्या खुलासामुळे गुंतवणूकदारांवर परिणाम झाला.

- Advertisement -

हेही वाचा – Cryptocurrency Earning : Cryptocurrency ची किमया ९ वर्षांची बहिण, अन् १४ वर्षांचा भाऊ झाला कोट्याधीश


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -