Sunday, February 21, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश भारतातील 'या' राज्यात तयार होणार जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय

भारतातील ‘या’ राज्यात तयार होणार जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय

मुकेश अंबानींनी घेतला पुढाकार, २०२३ मध्ये सुरु होण्याची शक्यता

Related Story

- Advertisement -

भारतात २०२३ पर्यंत जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय तयार होणार आहे. भारतातील जगप्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या प्राणी संग्रहालयासाठी पुढाकार घेतला आहे. गुजरातमधील जामनगर येथे हे भव्य प्राणीसंग्रहायलय उभारले जाणार आहे. या ठिकाणी रिलायन्स समुहाचा तेल शुद्धीकरणाचा मोठा प्रकल्प सुरु आहे. २०२३ पर्यंत या प्राणी संग्रहालयाचे काम होण्याची शक्यता पूर्ण होण्याची शक्यता रिलायन्स कॉर्पोरेट अफेअर्सचे अध्यक्ष पिरामल नाथवानी यांनी वर्तवली आहे. याठिकाणी स्थानिक सरकारच्या मदतीसाठी रेस्क्यू सेंटरदेखील असणार आहे.
येत्या दोन वर्षात या संग्रहालयाची उभारणी पूर्ण झाल्यानंतर पर्यटकांसाठी खुलं करण्यात येणार आहे. यामध्ये विविध जातीचे प्राणी, पक्षी आणि सरपटणारे जीव पर्यटकांना पाहता येणार आहेत. मुखत्त्वे चित्ता, आफ्रिकल सिंह, झेब्रा, आफ्रिकन हत्ती, पान गेंडा, असे अनेक प्राणी पाहता येणार आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे एमडी मुकेश अंबानी यांचे लहान पुत्र अनंत अंबानी या प्रकल्पाचे काम पाहत आहेत. कोरोना संकटामुळे २०२० मध्ये या संग्रहालायाचा कामाला ब्रेक लागला परंतु २०२३ पर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.( building a worlds largest zoo Reliance took the initiative)

Campden वेल्थच्या डायरेक्टर ऑफ रिसर्च रिबेका गूच यांच्या माहितीनुसार, अंबानींकडे कल्पनाशक्तीला सत्त्यात उतरवण्यासाठी आर्थिक ताकद आहे. त्यामुळे अंबानी अब्जाधीश अशा प्रकल्पांमध्ये का गुंतवणूक करतात यावरही स्पष्टीकरण दिले. याविषयी बोलताना ते सांगतात, सार्वजनिक कार्यातील गुंतवणुकीमुळे एकंदरीत कुटुंब आणि कंपनी या दोघांचीही प्रतिमा उंचावण्यास मदत मिळते. यामुळे नफा आणि काही नकारात्मक गोष्टींवर पडदा पाडण्यास मदत मिळते. यामुळे समाजात त्या व्यक्तीची प्रतिष्ठा चांगली होते आणि भविष्यासाठीही ते उत्तम असतं असं त्यांनी नमूद केलं.


हेही वाचा- परीक्षा सुरु असतानच विद्यार्थीनीने दिला बाळाला जन्म

- Advertisement -

 

- Advertisement -