घरदेश-विदेशमुकेश अंबानी गुजरातमध्ये ३ लाख कोटींची करणार गुंतवणूक

मुकेश अंबानी गुजरातमध्ये ३ लाख कोटींची करणार गुंतवणूक

Subscribe

येत्या काळात रिलायन्स गुजरातमध्ये एक मोठी गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणूकीमुळे येथील नागरिकांना रोजगार मिळणार असल्याचे उद्योजक मुकेश अंबानी यांनी सांगितले आहे.

जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि भारतातील मोठे उद्योजक मुकेश अंबानी यांनी गुजरात राज्यासाठी एका मोठी घोषणा केली आहे. गुजरातमध्ये येत्या काळात मुकेश अंबानी ३ लाख कोटींची गुंतवणूक करणार आहेत. पुढील दहा वर्षांमध्ये ही गुंतवणूक केली जाणार असल्याचे अंबानी यांनी सांगितले आहे. ही गुंतवणूक ऊर्जा आणि पेट्रोकेमिकलपासून नवीन तंत्रज्ञान आणि डिजिटल व्यवसायापर्यंतच्या उद्योगात केली जाणार आहे. व्हायब्रंट गुजरात ग्लोबलच्या ९व्या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली आहे. “गुजरात ही रिलायन्सची जन्मभूमी आहे. उद्योगाला चालना देण्यासाठी गुजरात रिलायन्सची पहिली आवड आहे. आम्ही ३ लाख कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. आम्ही केलेल्या गुंतवणूकीमुळे येथील लाखो लोकांना काम मिळणार आहे. मागील दक्षकापासून बघायला गेले तर येत्या काळात रिलायन्स आपली गुंतवणूक वाढवणार आहे.” असे अंबानी म्हणाले. 

पंतप्रधांनाना केले आवाहन

भारतीयांचा डेटा दुसऱ्या देशात न जाता तो भारतीय कंपनींकडे राहावा असे आवाहन मुकेश अंबांनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केले आहे. भारतीयांचा डेटा बाहेरील कंपन्याकडे असल्यामुळे त्याचा गैरवापर होऊ शकतो. यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. लवकरच रिलायन्स ग्रूप ५ जी इंटनेट सुरु करणार असल्यामुळे लोकांना येत्या काळात जलद इंटरनेट मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदीही गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी येथे आयोजित केलेल्या एका प्रदर्शनीमध्ये चादर विकत घेतली. या चादरीचे पैसे त्यांना रुपे कार्डने केले होते. यावरून पेमेंट करण्यासाठी रुपे कार्डचा वापर करा असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -