Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर अर्थजगत करदात्यांना दिलासा! आधार कार्ड-पॅन कार्ड लिंकसाठी पुन्हा मुदत वाढवली

करदात्यांना दिलासा! आधार कार्ड-पॅन कार्ड लिंकसाठी पुन्हा मुदत वाढवली

Subscribe

Pan Card and Adhaar Card Link | सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स म्हणजेच सीबीडीटी हा निर्णय घेतला आहे.

Pan Card and Adhaar Card Link | नवी दिल्ली – आधार कार्ड (Adhaar Card) आणि पॅन कार्ड (Pan Card) लिंक करण्याच्या मुदतीस वाढ दिली आहे. कार्डधारक आता ३० जूनपर्यंत दोन्ही कार्ड लिंक करू शकणार आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स म्हणजेच सीबीडीटी हा निर्णय घेतला आहे.

आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी केंद्र सरकारकडून वारंवार आवाहन केले जात आहे. आयकर कायदा १९६९ च्या कलम 139AA नुसार ज्यांच्याकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असे दोन्ही कार्ड आहे त्यांनी हे लिंक करणे अनिवार्य आहे. ही दोन्ही कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२३ होती. त्यानंतर हे दोन्ही कार्ड लिंक करण्यासाठी कार्डधारकांना शुल्क भरावे लागणार होते. परंतु, आता सीबीडीटी ने दिलासा दिला असून कार्डधारक ३० जून २०२३ पर्यंत लिंक करू शकणार आहेत.

- Advertisement -

तुमचंही कार्ड लिंक आहे ना?

  • https://www.incometax.gov.in/iec/foportal/ या संकेतस्थळाला भेट द्या.
  • डाव्या बाजूला क्विक लिंक्सच्या भागात लिंक आधार स्टेटसवर क्लिक करा.
  • तिथे दिलेल्या रिकाम्या रकान्यात पॅन नंबर आणि आधार कार्ड नंबर भरा.
  • तुम्हाला आता एक पॉप-अप संदेश प्राप्त होईल.
  • जर तुमचे दोन्ही कार्ड लिंक झालेले असतील तर तुमचा पॅन आधीच दिलेल्या आधारशी लिंक केलेला आहे, असा संदेश पॉपद्वारे मिळेल.
  • जर लिंक झालेले नसेल तर त्याबाबतही कळवण्यात येते.
  • तुम्हाला दोन्ही कार्ड लिंक करायचे असतील तर लिंक आधारवर क्लिक करा.
  • लिंक प्रक्रियेत असल्यास करदात्याला त्याच्या विंडोवर दिसेल की तुमची आधार-पॅन लिकिंग रिक्वेस्ट व्हेरिफिकेशनसाठी UIDAI कडे पाठवली गेली आहे.
  • थोड्या वेळानंतर पुन्हा लिंक आधार स्टेटसवर जाऊन वरील प्रक्रियेनुसार कार्डचे लिंक स्टेटस तपासा.

लिंक न केल्यास काय होईल?

- Advertisement -

अंतिम तारखेपर्यंत लिंक न केल्यास १ जुलै २०२३ पासून करदात्यांना आर्थिक व्यवहार करताना अडचणी येऊ शकतात. तुमचं पॅन कार्ड १ जुलै २०२३ नंतर निष्क्रिय होणार आहे. त्यामुळे तुम्ही वित्त संबंधित कोणतीही कामे करू शकणार नाहीत. बँक खात्याशी संबंधित व्यवहारही करता येणार नाहीत.

- Advertisment -