घरCORONA UPDATEखळबळजनक! गुजरातमध्ये कोरोना रुग्णांसाठी धर्मावर आधारित वेगवेगळे कक्ष

खळबळजनक! गुजरातमध्ये कोरोना रुग्णांसाठी धर्मावर आधारित वेगवेगळे कक्ष

Subscribe

कोरोना रुग्णांसाठी धर्मावर आधारित वेगवेगळे कक्ष करण्यात आले असल्याची खळबळजनक घटना गुजरातमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे.

कोरोना रुग्णांसाठी धर्मावर आधारित वेगवेगळे कक्ष करण्यात आले असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. गुजरातमधील एका रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार; अहमदाबादमध्ये असलेल्या एका रुग्णालयात धर्मानुसार कक्षात विभागणी केली जात आहे. दरम्यान, सरकारी आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. परंतु, याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार; अहमदाबादमध्ये १ हजार २०० खाटांचे शासकीय रुग्णालय असून त्यात १८६ रुग्ण भरती केले आहेत. त्यात १५० कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यामध्ये ४० मुस्लिम समाजाचे आहेत. रविवारी रात्रीच्या सुमारास २८ रुग्णांना A – 4 वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे. तर इतर रुग्णांना C – 4 वॉर्डमध्ये हलवण्यात आले. याबाबत रुग्णांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले ती रुग्णांसाठीच हे बदल केले आहेत.

- Advertisement -

हिंदू आणि मुस्लिम रुग्णांना वेगळे कक्ष

साधारणत: पुरुष आणि महिलांचे कक्ष वेगळे असतात. मात्र, आम्ही या रुग्णालयात राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार हिंदू आणि मुस्लिम रुग्णांना वेगळे ठेवण्यात आले आहे. याबाबत तुम्ही सरकारशी बोलू शकता. – डॉ. गुणवंत राठोड; रुग्णालयाचे मेडिकल सुपरीटेंड

याबाबत आपल्याला काहीच कल्पना नाही. तसेच याबाबत चौकशी केली जाईल. – नितीन पटेल; राज्याचे उपमुख्यमंत्री

- Advertisement -

आम्ही काहीच सूचना केल्या नव्हता. तसेच सरकारने काही सूचना दिल्या असतील त्याबाबतही काही कल्पना नाही. – के. के. निरला; अहमदाबादचे जिल्हाधिकारी


हेही वाचा – परिचारिकेला मारहाण केल्याप्रकरणी कूपर रूग्णालयामध्ये काम बंद आंदोलन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -