घर ट्रेंडिंग 2023 मधील उरलेले 4 महिने घातक; बाबा वेंगाची धक्कादायक भविष्यवाणी

2023 मधील उरलेले 4 महिने घातक; बाबा वेंगाची धक्कादायक भविष्यवाणी

Subscribe

आपला भविष्यकाळ कसा असेल याची उत्सुकता अनेकांमध्ये असते. मागील काही वर्षांपासून जगभरामध्ये भविष्य ऐकण्याकडे आणि वाचण्याकडे अनेकांचा कल दिसून येतो. यामध्ये काही भविष्यवाण्या सुप्रसिद्ध भविष्यवक्ता ‘बाबा वेंगा’ यांनी केल्या आहेत. त्यांनी जगावर येणाऱ्या संकटांबद्दल आधी वक्तव्य करून ठेवली आहेत. 2023 साठी देखील बाबा वेंगा यांनी अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या.

2023 साठी बाबा वेंगाच्या भविष्यवाण्या

  • बाबा वेंगा यांनी 2023 मध्ये महायुद्ध होण्याची शक्यता वर्तवली होती. रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या एक वर्षाहून अधिक काळ युद्ध सुरू आहे.
  • तसेच बाबा वेंगा यांनी जगातील अनेक देशांमध्ये भीषण पूर आणि वादळ येण्याची शक्यता वर्तवली होती. जे भारतासह अनेक देशांमध्ये यावर्षी पाहायला मिळाले आहे.
  • बाबा वेंगाच्या 2023 च्या अंदाजानुसार, या वर्षी तिसरे महायुद्ध होऊ शकते ज्यामध्ये अणुहल्ला देखील केला जाऊ शकतो. या युद्धामुळे संपूर्ण जगात विनाश होऊ शकतो.
  • 2023 मध्ये एक मोठी खगोलीय घटना घडणार आहे ज्यामध्ये पृथ्वीच्या कक्षेत बदल होणार आहे. या घटनेचा पर्यावरणावर खोलवर परिणाम होऊन पृथ्वीला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.
  • बाबा वेंगा यांच्यानुसार, 2023 मध्ये अनेक विचित्र वैज्ञानिक शोध लागतील . या वर्षी काही देश जैविक शस्त्रे शोधतील. या प्रयोगामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होऊ शकतो.
  • बाबा वेंगा यांनी 2023 हे वर्ष अंधार आणि शोकांतिकेचे वर्ष म्हणून वर्णन केले आहे.

2024 साठी बाबा वेंगाचे भाकीत

बाबा वेंगाच्या मते, 2024 मध्ये चीन जगाची महासत्ता बनेल. पुढील वर्षी हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग आणि भूकंपामुळे पृथ्वीची स्थिती बिकट होणार आहे. तसेच 2025 मध्ये युरोप निर्जन होऊ शकतो. 2288 पर्यंत टाईम ट्रॅव्हल प्रत्यक्षात येईल असा दावाही त्यांनी केला होता.

कोण होत्या बाबा वेंगा?

- Advertisement -

Phenomenon (1976) | MUBI

मिळालेल्या माहितीनुसार, बाबा वेंगा एक फकीर होती. जी बुल्गारियामध्ये राहणारी होती. त्यांचा जन्म 1911 मध्ये झाला, वयाच्या 12 व्या वर्षी ते दृष्टीहीन झाले. असं म्हणतात की, त्यांनी केलेल्या 85 टक्के भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. तर काही दावे खोटे देखील ठरले आहेत. शिवाय त्यांनी सांगितलेल्या भविष्यवाण्या कुठेही लिहिलेल्या नाहीत. बाबा वेंगांनी या भविष्यवाण्या त्यांच्या अनुयायींना सांगितल्या होत्या आणि त्यांनी या लिहिल्या. 1996 मध्ये बाबा वेंगा यांचा मृत्यू झाला. मात्र, मरणापूर्वी त्यांनी वर्ष 5079 पर्यंतच्या भविष्यवाण्या केल्या आहेत. कारण बाबा वेंगांच्या मते 5079 जग नष्ट होणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -