घरCORONA UPDATEरेमडेसिवीर इंजेक्शन घेणं रुग्णांना पडले भारी, वाढतोय राग आणि चिडचिडेपणा

रेमडेसिवीर इंजेक्शन घेणं रुग्णांना पडले भारी, वाढतोय राग आणि चिडचिडेपणा

Subscribe

कोरोना विषाणुच्या दुसऱ्या लाटेदरम्यान रेमडेसीविर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे हाहाकार माजला होता. यामुळे देशातील अनेक भागांमध्ये रेमडेसीविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरु होता. ९०० ते ३५०० रुपयांपर्यंतच्या इंजेक्शनसाठी रुग्णांना तब्बल ४० हजार रुपये मोजावे लागत होते. परंतु रुग्णांना कोरोनापासून बचावासाठी देण्यात आलेल्या या इंजेक्शनचे आता गंभीर दुष्परिणाम दिसत आहेत. पोस्ट कोविड साइड इफेक्टमध्ये रेमडेसीविर इंजेक्शन घेतलेल्या कोरोनामुक्त लोकांमध्ये कमजोरीसह चिडचिडेपणा वाढत आहे. यावर इंदोरमधील अरबिंदो इंस्टिट्यूड ऑफ मेडिकल सायन्ससचे छाती रोग विभागाचे प्रमुख डॉ. रवी डोसी यांनी सांगितले की, पोस्ट कोविड लक्षणांमध्ये काही लोकांमध्ये अशक्तपणा आणि चिडचिडेपणा वाढत आहे. यामागे कोरोना उपचारादरम्यान देण्यात आलेल्या रेमडेसीविर इंजेक्शन संभाव्य कारण असू शकते असेही ते म्हणाले.

शरीरात काही वेळा ऑक्सिजनच्या अभावामुळे असे होत असल्याचे डॉ. रवी डोसी सांगतात. शरीरात सीआरपीचे प्रमाण वाढल्यामुळे आणि फॅरीटिनच्या कमतरतेमुळे चिडचिडेपणा आणि अशक्तपणा किंचित वाढत आहे. कारण यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते आणि रक्त थोडे घट्ट होते. ज्यामुळे ती व्यक्तीमध्ये सुस्तपणा आणि आळशीपणा वाढतो. यात जर सामान्य व्यक्ती आपल्या शारिरीक क्षमतेपेक्षा कमी काम करत असेल तर त्यामध्ये चिडचिडेपणा आणि अशक्तपणा वाढतोयं.

- Advertisement -

रेमडेसिवीर केवळ अँटी-व्हायरस औषध

रेमडेसिवीर हे केवळ अँटी-व्हायरस औषध असून ते शरीरात कोरोना विषाणुचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी मदत करत होते. परंतु सरकारच्या म्हणण्यानुसार, रेमडेसिवीर इंजेक्शनचे हे व्यक्तीचे जीवन वाचवणारे औषध नाही. तर WHO च्या म्हणण्यानुसार, हे औषध रुग्णाच्या गंभीर परिस्थितीत काम करत नाही. तर या औषधाचे बरेच दुष्परिणाम आहेत. २००९ मध्ये अमेरिकेच्या गिलीज साइंसेजने हेपेटाइटिस-सीवरील उपचारांसाठी हे औषध तयार केले होते. यावर २०१४ पर्यंत संशोधन चालू होते त्यानंतर हे औषध घातक इबोला आजारावर वापरण्यास सुरुवात झाली.
त्यानंतर रेमडेसिवीरचा उपयोग मिडिल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम आणि सीवियर एक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोमच्या उपचारांसाठी केला गेला. सध्या भारतातील सात कंपन्या या औषधांची निर्मिती करत आहे. ज्यांची एकूण उत्पादन क्षमता दरमहा ३९ लाख कुपी तयार करणे आहे.

आरोग्य तज्ञांच्या मते, रेमडेसिवीर औषध कोरोना रूग्णांसाठी चमत्कारिक औषध नाही. त्यामुळे केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यावनुसारच हे औषध घेणे योग्य आहे. सहसा बहुतेक रूग्णांना या औषधाची गरज नसते. कोरोना संसर्गानंतर विशिष्ट लक्षणांपर्यंतच या इंजेक्शनचा वापर केला जातो. केवळ ज्या रुग्णांची ऑक्सिजनची पातळी कमी झाली आहे अशा रुग्णांनाच याची आवश्यकता आहे. परंतु या इंजेक्शनच्या वापरामुळे काही रुग्णांच्या हृदय आणि यकृतावर गंभीर दुष्परिणाम दिसले आहेत.

- Advertisement -

‘हे’ आहेत औषधाचे दुष्परिणाम

रेमडेसीविरचा सर्वाधिक वापर केल्यास यकृत आणि किडणीवर परिणाम होतो. तसेच शरीरावर एलर्जी येत आहे. तसेच ब्लड प्रेशर आणि हार्ट रेटमध्ये चढ-उतार होत आहेत. रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होणे, ताप येणे, श्वास घेण्यात त्रास होणे, पुरळ उठणे, मळमळ होणे, ओठांना सूज येणे, डोळ्यांभोवती किंवा त्वचेच्या खाली आणि घाम येणे किंवा थरथरणे, अशक्तपणा आणि चिडचिडेपणा उद्भवू शकतो.


डेल्टा व्हेरिएंटविरोधात कोव्हिशील्ड आणि कोवॅक्सीन लस प्रभावी, केंद्रीय आरोग्य विभागाची माहिती


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -