घरताज्या घडामोडीRemdesivir Injection: प्लाझ्मा थेरेपीनंतर आता रेमडेसिवीर कोरोना उपचारपद्धतीतून वगळणार!

Remdesivir Injection: प्लाझ्मा थेरेपीनंतर आता रेमडेसिवीर कोरोना उपचारपद्धतीतून वगळणार!

Subscribe

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर काही थांबायचे नाव घेत नाही तोवर तिसरी लाट येण्याची शक्यता वैज्ञानिकांकडून वर्तवली जात आहे. यादरम्यान सातत्याने कोरोनामुक्त रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करण्यात येत होते. पण आता आयसीएमआरच्या कोरोना उपचारपद्धतीतून प्लाझ्मा थेरेपी हटवण्यात आली आहे. आता ज्या रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रात्रंदिवस लोकं भल्या मोठ्या रांगेत उभे असायचे, लाखो रुपये खर्च करायचे तेच रेमडेसिवीर इंजेक्शन कोरोना रुग्णांवर परिणामकारक नसल्याचा सुतोवाच गंगाराम रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. डी.एस राणा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केला आहे.

डॉ. राणा म्हणाले की, ‘प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या शरीरातील अँटीबॉडीज आपण कोरोनाबाधित रुग्णाला देतो. जेणेकरून अँटीबॉडीज व्हायरसला नष्ट करतील. कोरोनाबाधित झाल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. पण प्लाझ्मा दान केल्यानंतरही रुग्णांमध्ये कोणतीही सुधारणा होत नाही, असे दिसून आले आहे. गेल्या वर्षभरापासून आम्ही हे पाहात आहोत. तसेच प्लाझ्मा सहजरित्या उपलब्ध देखील होत नाही आहे. मात्र पुराव्याच्या आधारे प्लाझ्मा थेरेपी कोरोना उपचार पद्धतीतून वगळण्यात आली आहे.’

- Advertisement -

पुढे डॉ. राणा म्हणाले की, ‘कोरोना उपचारामध्ये वापरल्या जाणाऱ्या इतर औषधांबाबत बोलायचे झाल्यास, रेमडेसिवीरचा रुग्णांवर योग्य परिणाम होत असल्याचे कोणतेही पुरावे नाही आहेत. रेमडेसिवीरचा कोरोना रुग्णावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. त्यामुळे प्लाझ्मा थेरेपी नुसार रेमडेसिवीर कोरोना उपचारपद्धतीतून वगळायला हवे. तसेच रेमडेसिवीर लवकरच कोरोनाबाधितांच्या उपचारातून वगळण्याची शक्यता आहे.’


हेही वाचा – Coronavirus: लहान मुलांमध्ये कोरोनाचा वाढता कहर! १०० पैकी २० मुलांना संसर्ग होण्याचा धोका

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -