घरCORONA UPDATEरेमडेसिवीर रामबाण उपाय नाही, देशातील तीन मोठ्या डॉक्टरांचा पत्रकार परिषदेत खुलासा

रेमडेसिवीर रामबाण उपाय नाही, देशातील तीन मोठ्या डॉक्टरांचा पत्रकार परिषदेत खुलासा

Subscribe

ज्यांना खरंच गरज आहे अशा रुग्णांना रेमडेसिवीर द्यायला हवे त्यामुळेच रेमडेसिवीरचा तुटवडा कमी होईल.

देशात दररोज लाखो लोक कोरोना पॉझिटिव्ह केसेस समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर देशातील तीन मोठ्या डॉक्टरांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी देशाच्या जनतेला कोरोना विषयी, रेमडेसिवीर इंजेक्शन विषयी महत्त्वाच्या सूचना दिल्या. ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे डॉक्टर रणवीर गुलेरिया ( एम्स रुग्णालय,दिल्ली), डॉक्टर देवी शेट्टी ( नारायण हेल्थ ) आणि डॉक्टर नरेश त्रेहन ( मेदांता रुग्णालय) यांनी संवाद साधला. या संवादात डॉक्टर नरेश त्रेहन यांनी कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनविषयी महत्त्वाची माहिती दिली. रेमडेसिवीर इंजेक्शन हे कोरोनावर रामबाण नाही, असे महत्त्वपूर्ण विधान त्यांनी केले. ज्यांना खरंच गरज आहे अशा रुग्णांना रेमडेसिवीर द्यायला हवे त्यामुळेच रेमडेसिवीरचा तुटवडा कमी होईल. इंजेक्शन वाया घालवण्यापेक्षा योग्य रुग्णांसाठी त्याचा वापर करा, असे ते म्हणाले.

डॉक्टर नरेश त्रेहन यांनी पुढे असेही म्हटले की, कोरोनाची लक्षणे दिसल्यास पहिल्यांदा स्वत:ला आयसोलेट करा. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास रुग्णालयात जाण्याची घाई करु नका. लक्षणे कमी प्रमाणात असतील तर घरीच क्वारंटाईन होणे योग्य आहे. जर तुमच्या शरीरातील ऑक्सिजन पातळीमध्ये कमी जास्त परिणाम होऊ लागल्यास रुग्णालयात जा. रुग्णालयात जाण्याआधी अँपच्या सहाय्याने माहिती करुन घ्या.

- Advertisement -

डॉक्टर त्रेहन यांच्याप्रमाणेच इतर दोन डॉक्टरांनीही त्यांची मते मांडली. दिल्लीच्या एम्स रुग्णातील डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, देशात ८५ टक्के रुग्ण हे रेमडेसिवीर इंजेक्शन न घेताच बरे होत आहेत. सर्दी, खोकल्यासारखी लक्षणे असतील तर ७-८ दिवस घरीच उपचार करुन बरे होऊ शकता. त्याचप्रमाणे गुलेरिया यांनी असेही म्हटले की, जे लोक घरीच क्वारंटाईन आहेत किंवा रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यांनी घाबरु नका. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शन जादूची गोळी नाही. त्यामुळे दोन्हीचा योग्य वापर झाला पाहिजे.

तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह असाल तर घाबरु नका. कारण कोरोना हा आजार आता सामान्य झाला आहे. सतत मास्कचा वापर करा. त्याचप्रमाणे तुमची ऑक्सिजन पातळी चेक करत रहा. ऑक्सिजन पातळी ९४पेक्षा कमी झाली तरच डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे डॉक्टर देवी शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कोरोनाची लक्षणे आढळली तर लवकरात लवकर चाचणी करुन घ्या. जर काही गंभीर नसेल तर घरीच राहून उपचार करा, असे ते म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Corona लागण झाल्यावर वास का येत नाही ? संशोधक म्हणतात…

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -