Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश मंगल मिशनची खिल्ली उडविणाऱ्या New York Times मधील 'त्या' कार्टुनची झाली आठवण;...

मंगल मिशनची खिल्ली उडविणाऱ्या New York Times मधील ‘त्या’ कार्टुनची झाली आठवण; युझर्सनी केले ट्रोल

Subscribe

झालेला अपमान विसरतील ते भारतीय कसले. उत्तर देऊ पण वेळ आल्यावर. असे मनी आशा बाळगून असलेल्या भारतीयांसाठी वेळ धावून आली.

नवी दिल्ली : भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर चांद्रयान-3 चे यशस्वी लॅंडिंग केल्यानंतर संपूर्ण जगात भारताचे कौतूक होत आहे. दरम्यान याआधीच मंगल मिशनची खिल्ली उडविणाऱ्या न्यूयॉर्क टाइम्सच्या त्या नऊ वर्षापूर्वीच्या कार्टुनची भारतीयांना आठवण झाली असून, युझर्सनी ते कार्टुन बनविणाऱ्या कार्टुनिस्टला चांगलेच ट्रोल केले आहे.(Reminds me of ‘that’ cartoon in the New York Times mocking the Mars mission; Trolled by users)

झालेला अपमान विसरतील ते भारतीय कसले. उत्तर देऊ पण वेळ आल्यावर. असे मनी आशा बाळगून असलेल्या भारतीयांसाठी वेळ धावून आली. तर चांद्रयान-3 च्या यशस्वी लॅंडिंगनंतर भारतीयांना नऊ वर्षापूर्वीची आठवण झाली. त्यांनी ती आठवण करत झालेल्या अपमानाचा बदला घेतला.

काय होता तो किस्सा वाचा-

- Advertisement -

झाले असे होते की, भारताने अगदी कमी खर्चात 2014 मध्ये मंगल मिशन यशस्वी केले होते. या कामगिरीमुळे संपूर्ण जगाने भारताचे कौतूक केले होते. या कौतुकात अमेरिकेतील प्रतिष्ठीत दैनिकांपैकी एक असलेल्या न्यूयॉर्क टाईम्स या दैनिकांने भारताच्या या यशाचे कौतूक केले होते पण अगदी संकुचितपणे. तर याच दिवशी न्यूयॉर्क टाईम्सने एक अपमानजनक कार्टुनही प्रकाशित केले होते.

हेही वाचा : BRICS मध्ये चांद्रयान -3ची चर्चा; पंतप्रधान मोदी म्हणाले…

काय होते त्या कार्टुनमध्ये?

- Advertisement -

तर त्या प्रकाशित झालेल्या कार्टुनमध्ये असे होते की, एक शेतकरी एका गाय सोबत एका खोलीबाहेर उभा आहे आणि तिथे लिहलेले आहे एलीट स्पेस क्लब, तर त्या रुममध्ये दोन व्यक्ती सुटा-बुटात बसलेले आहेत. एकुणच ते दोन जण युरोपातील वैज्ञानिक होते. आणि लिहले होते भारताचे स्वस्त असे मंगल मिशन एलीट स्पेस क्लबच्या बाहेर पोहचताना…

हेही वाचा : उत्तर प्रदेशमध्ये भाविकांवर काळाचा घाला; ट्रॅक्टर नदीत उलटून 9 जणांचा मृत्यू

भारतीयांनी घेतला बदला

बुधवारी जेंव्हा भारताचे चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर जाऊन पोहचले तेव्हा भारतीयांनी ते नऊ वर्षापूर्वीचे कार्टुन शोधून काढत न्यूयॉर्क टाइम्सला टॅग केले आणि लिहले आता वेळ आहे दुसरे कार्टुन छापण्याची. विशेष म्हणजे जेंव्हा हे कार्टुन छापून आले होते तेव्हा न्यूयॉर्क टाइम्सने माफीसुद्धा मागितली होती.

- Advertisment -