घरताज्या घडामोडी'...आणि मगच सिनेमागृह खुली करणार'

‘…आणि मगच सिनेमागृह खुली करणार’

Subscribe

जून महिन्यात कोरोना विषाणूची परिस्थिती पाहून त्यानंतर सिनेमागृह खुली केली जातील, असा निर्णय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घेतला आहे.

‘जून महिन्यात कोरोना विषाणूची परिस्थिती पाहून त्यानंतर सिनेमागृह खुली केली जातील’, असा निर्णय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घेतला आहे. दरम्यान, मंगळवारी असोसिएशन ऑफ फिल्म प्रोड्युसर, सिनेमा एक्झिक्युटर्स आणि फिल्म इंडस्ट्री यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीमध्ये हा महत्त्वाच्या निर्णयाबाबत चर्चा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे चित्रपट, मालिका आणि नाटक यांच्या शूटींगचे काम बंद करण्यात आले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात फिल्म इंडस्ट्रीचे नुकसान झाले असून याबाबत यावेळी चर्चा केली गेली.

मिळालेल्या माहितीनुसार; फिल्म इंडस्ट्री केव्हा सुरु केली जाणार असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावेळी जावडेकर म्हणाले, ‘सध्या काही ठिकाणी नियम शिथिल करण्यात आले आहेत. तसेच काही ठिकाणी आता छोटे – मोठे उद्योगही सुरु केले जात आहे. मात्र, फिल्मबाबत जून महिन्यात कोरोनाची स्थिती जाणून निर्णय घेतला जाणार आहे’.

- Advertisement -

२४ तासांत ८,९०९रुग्ण

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मागील २४ तासांत ८ हजार ९०९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. ही वाढ कोरोनाबाधितांची आतापर्यंतची २४ तासातली सर्वाधित वाढ आहे. तर गेल्या २४ तासांत २१७ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ लाख ७ हजार ६१५ झाली आहे. त्यापैकी ५ हजार ८१५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख ३०३ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत ४ हजार ७७६ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट ४८.३१ टक्के आहे. सध्या देशात कोरोनाची लागण असलेले म्हणजेच अॅक्टिव्ह रुग्ण १ लाख १ हजार ४९७ आहेत.


हेही वाचा – Corona: केंद्रातील हालचालींना वेग; आठवड्याभरात कॅबिनेटची दुसऱ्यांदा बैठक


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -