घरताज्या घडामोडीअरुणाचलवर मोदी सरकारचे लक्ष केंद्रीत, चीनला उत्तर देण्यासाठी होणार बौद्ध नेत्यांचे राष्ट्रीय...

अरुणाचलवर मोदी सरकारचे लक्ष केंद्रीत, चीनला उत्तर देण्यासाठी होणार बौद्ध नेत्यांचे राष्ट्रीय अधिवेशन

Subscribe

या महिन्याच्या सुरुवातीला चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांची नावे जाहीर केली. त्यावर भारताने तीव्र प्रतिक्रिया दिली. तसेच, चीनचा दावा फेटाळून लावला. तसेच, अरुणाचलमधील संबंधित परिसरावर चीनकडून हक्क दाखवण्यापूर्वीच मोदी सरकारने नवी खेळी सुरू केली आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांची नावे जाहीर केली. त्यावर भारताने तीव्र प्रतिक्रिया दिली. तसेच, चीनचा दावा फेटाळून लावला. तसेच, अरुणाचलमधील संबंधित परिसरावर चीनकडून हक्क दाखवण्यापूर्वीच मोदी सरकारने नवी खेळी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अरुणाचलमध्ये दौरा करत नैसर्गिक सौंदर्याचे व्हिडीओ शूटिंग केले होते. हा व्हिडीओ शेअर करत भारतीय नागरिकांना या परिसरात जाण्याचे आवाहन केल. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हा व्हिडीओ ट्वीट केला होता. अशातच आता अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये हिमालयीन प्रदेशातील सर्वोच्च बौद्ध नेत्यांचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनावर देखील मोदी व शाह यांनी लक्ष्य केंद्रीत केले आहे.

हिमालयीन प्रदेशात बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी प्रयत्न

- Advertisement -

अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमधील जेमिथांग भागातील गोरसम स्तूप येथे सोमवारी नालंदा बौद्ध परंपरेचे एक दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. हिमालयीन प्रदेशातील बौद्ध नेते इतक्या मोठ्या संख्येने एकत्र आले आहेत हे अत्यंत दुर्मिळ आहे. विशेष म्हणजे हे स्पष्टपणे चीनला उत्तर म्हणून मानले जात आहे. ही परिषद ज्या झेमिथांग गावात होत आहे, ते अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवरील शेवटचे गाव आहे. या परिषदेत 600 बौद्ध प्रतिनिधी सहभागी झाले होते. हिमालयीन प्रदेशात बौद्ध धर्माचा प्रसार करण्याच्या दृष्टीने ही एक मोठी परिषद मानली जात आहे.

या बौद्ध संमेलनात हिमाचल प्रदेश, लडाख, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, सिक्कीम, उत्तर बंगाल आणि अरुणाचल प्रदेश, तुटिंग, मेचुका, टाकसिंग आणि अनिनीच्या विविध भागातून 35 बौद्ध प्रतिनिधी सहभागी होत आहेत.

- Advertisement -

या कार्यक्रमादरम्यान, “बौद्ध संस्कृतीचे केवळ जतन करण्याची गरज नाही तर तिचा प्रचारही करण्याची गरज आहे. जेमिथांग हे ते ठिकाण आहे जिथून दलाई लामा पहिल्यांदा भारतात आले. अशा स्थितीत येथे संमेलनाचे आयोजन महत्त्वाचे आहे. नालंदा विद्यापीठातील विद्वान, आचार्य संतर्कित आणि नागार्जुन इत्यादींनी केवळ तिबेटमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार केला”, असे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू म्हणाले.

भारतातील पहिले गाव किबिथू येथे जावे – अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अरुणाचल प्रदेशाचा दौरा केला आणि सुईच्या अग्राइतक्या जमिनीवरील परकियांचा ताबा खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड इशारा त्यांनी येथे दिला. अरुणाचल प्रदेशातील भारतातील पहिले गाव किबिथू येथे जाण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी नागरिकांना केले. तसेच, निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी लोकांनी येथे यावे आणि इतिहासापासून प्रेरणा घ्यावी, असे गृहमंत्री म्हणाले. एकूणच चीनच्या कुरापतीनंतर केंद्र सरकारने अरुणाचल प्रदेशकडे लक्ष केंद्रीत केले आहे.


हेही वाचा – सुदानमध्ये लष्करी दलांतील संघर्षात 200 नागरिकांचा मृत्यू तर, 1800 जखमी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -