Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशRepo Rate : आरबीआयने रेपो दरात केलल्या कपातीमुळे गृहकर्जाच्या हप्त्यात किती बचत होणार? वाचा -

Repo Rate : आरबीआयने रेपो दरात केलल्या कपातीमुळे गृहकर्जाच्या हप्त्यात किती बचत होणार? वाचा –

Subscribe

आरबीआयने मे 2022मध्ये दर वाढवण्यास सुरुवात केली आणि ही वाढ फेब्रुवारी 2023मध्ये थांबली. फेब्रुवारी 2023मध्ये तो 6.25 टक्क्यांवरून 6.50 टक्के करण्यात आला होता. त्यानंतर तो स्थिरच होता.

मुंबई : रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांच्या नेतृत्वाखालील पहिल्याच चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीत रेपो दराबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यांनी रेपो दर 0.25 टक्क्याने कमी करून मध्यमवर्गीयांना, विशेषत: कर्जदारांना दिलासा दिला आहे. यामुळे रेपो दर 6.25 टक्के झाला आहे. रेपोमध्ये कपात झाल्यामुळे आता सर्व प्रकारची कर्जे स्वस्त होतील. विशेषतः, गृहकर्ज असलेल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Repo Rate: Reduction in repo rate will result in savings in home loan EMIs)

कोरोना महामारीच्या काळात मे 2020मध्ये आरबीआयने रेपो दर 0.40 टक्क्यांनी कमी करून 4 टक्के केला होता. त्यानंतर, रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आव्हानांना तोंड देण्यासाठी, आरबीआयने मे 2022मध्ये दर वाढवण्यास सुरुवात केली आणि ही वाढ फेब्रुवारी 2023मध्ये थांबली. फेब्रुवारी 2023मध्ये तो 6.25 टक्क्यांवरून 6.50 टक्के करण्यात आला होता. त्यानंतर तो स्थिरच होता. पण आता घेतलेल्या लहान-मोठ्या कर्जदारांना फायदा होणार आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : बेड्या घालून घुसखोरांना परत पाठवत अमेरिकेनं भारताची इज्जत दाखवून दिली – संजय राऊत

तुम्ही 20 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले असेल आणि त्या कर्जावरील व्याजदर साडेआठ टक्के आणि कालावधी 20 वर्षांचा असेल तर, सध्या तुमचा ईएमआय 17,356 रुपये असणार. परंतु आरबीआयने 25 बेसिस पॉइंट कपात केल्यानंतर, कर्जाचा व्याजदर आता 8.25 टक्के होईल. या आधारावर, तुमचा ईएमआय आता 17,041 रुपयांवर येईल. म्हणजेच तुम्ही दरमहा 315 रुपये वाचवू शकाल.

30 लाखांच्या कर्जाचा ईएमआय इतका असेल

दुसरीकडे, तुम्ही 20 वर्षांच्या कालावधीसाठी 8.50 टक्के व्याजदराने 30 लाख रुपयांचे कर्ज घेतले असेल, तर तुम्हाला दरमहा 26,035 रुपये ईएमआय भरावा लागत असेल. परंतु आरबीआयने रेपो दरात केलेल्या कपातीमुळे हा मासिक ईएमआय 25,562 रुपयांपर्यंत कमी होईल. यानुसार, दरमहा सुमारे 473 रुपयांची बचत होईल.

50 लाखांवर वाचतील महिन्याला 788 रुपये

जर एखाद्याने 8.50 टक्के व्याजदराने 20 वर्षांसाठी 50 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले असेल, तर त्याला दरमहा 43,391 रुपये ईएमआय भरावा लागेल, परंतु रेपो दरात 25 बेसिस पॉइंट्सची कपात केल्यानंतर, हा मासिक ईएमआय 42,603 रुपये होईल. म्हणजे दरमहा 788 रुपये वाचतील. (Repo Rate: Reduction in repo rate will result in savings in home loan EMIs)

हेही वाचा – RBI Monetary Policy : सर्वसामान्यांना आणखी एक दिलासा, रेपो दरात 0.25 टक्क्याची कपात