भोपळा : देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मध्य प्रदेशमध्ये 230 सदस्यांच्या विधासभेच्या जागेसाठी 17 नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात मतदान झाले. पण मध्य प्रदेशाच्या चंबल केंद्र बूथ ताब्यात घेतल्याची तक्रार समाजवादी पक्षाकडून करण्यात आला. यामुळे चंबल येथील मतदान केंद्रावर फेरमतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चंबल येथील भिंड जिल्ह्याच्या अटेर विधानसभा मतदारसंघातील 71 क्रमांकाचा मतदान केंद्रवर गडबड झाल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. यानंतर निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर फेरमतदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा – तेलंगणात काँग्रेसचा झेंडा फडकणार, त्यांनतर केंद्रातील सरकारला खाली खेचू – राहुल गांधी
अटेर विधानसभेच्या किशुपुरा गावातील मतदान केंद्र 71 हे बूथ ताब्यात करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता आणि यासंबंधिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला होता. किशुपुरा येथे समाजवादी पक्षाचा मुन्ना सिंह भदौरिया हे उमेदवार असून हे त्यांचे मूळ गाव देखील आहे. मुन्ना सिंह भदौरिया यांनी बुथ ताब्यात घेतल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. या तक्रारीची निवडणूक आयोगाने दखल घेतली आणि मतदान केंद्र क्रमांक 71वर फेरमतदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा – शिवराज सिंह-कमलनाथांसह 2533 उमेदवारांचे भाग्य EVM मध्ये बंद; MP मध्ये सरासरी 71% मतदान
‘या’ दिवशी होणार फेरमतदान
यानुसार, 21 नोव्हेंबर रोजी अटेर विधानसभेच्या मतदान क्रमांक 71 येथे फेरमतदान होणार आहे. या केंद्रावर सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात होईल ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे, अशी माहिती भिंडेचे जिल्हाधिकारी संजीव श्रीवास्तव यांनी दिली आहे. त्याचबरोबर किशुपुराच्या मतदान केंद्रावरील सर्व कर्मचाऱ्यांना संजीव श्रीवास्तव यांनी निलंबित केले आहे. त्याचबरोबर मतदान क्रमांक 71रव 1223 पैकी 1103 मतदारांनी मतदान केले असून फेरमतदानासाठी केंद्रावर नवीन ईव्हीएम मशीन ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती संजीव श्रीवास्तव यांनी दिली.